शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात वर्षातील नीचांकी पारा, महाबळेश्वरही गारठले; 'इतक्या' अंश किमान तापमानाची नोंद 

By नितीन काळेल | Updated: January 9, 2023 18:56 IST

शीतलहर असल्याने गारठा चांगलाच झोंबू लागला

सातारा : जिल्ह्यातील पारा खालावत चालला असून, सातारा शहरात आज, सोमवारी ११.०९ अंश किमान तापमानाची नोंद झाली आहे. हे तापमान या हिवाळी ऋतूतील आतापर्यंतचे नीचांकी ठरले. तर महाबळेश्वरचाही पारा खालावलाय. त्यातच शीतलहर असल्याने गारठा चांगलाच झोंबू लागला आहे.जिल्ह्यात थंडी सुरू होऊन सवा दोन महिने झाले आहेत. ऑक्टोबर महिन्यातच थंडीला सुरुवात झाली होती. त्यावेळी किमान तापमान १३ अंशापर्यंत खाली आले होते. परिणामी, दिवाळीचे दिवस थंडीतच काढावे लागले होते. त्यानंतर नाेव्हेंबर महिना उजाडताच थंडीची तीव्रता कमी झाली होती. किमान तापमान २१ अंशावर पोहोचले होते. पण, आतापर्यंत थंडी सुरू होऊन दोन महिने होऊन गेले असले तरी कडाक्याची थंडी कधीच पडलेली नाही. कारण, सातारा शहरातील किमान तापमान हे कायम १५ अंशावर राहिले. तर थंड हवेचे महाबळेश्वरही कडाक्याच्या थंडीपासून दूर राहिले होते. कारण, हिवाळा ऋतू असूनही जिल्ह्यात कधीही सतत काही दिवस थंडी जाणवली नाही. किमान तापमानात सतत चढ-उतार सुरू आहे. आतापर्यंतच्या दोन महिन्यांत चारवेळा किमान तापमान १३ अंशापर्यंत खाली आले. त्याचबरोबर वाढत जाऊन २२ अंशांपर्यंत पोहोचले. त्यातच कमाल तापमानही वाढले होते. सातारा शहराचे तापमान ३२ अंशावर गेले होते. यामुळे पहाटे थंडी अन् दुपारी उन्हाचा चटका अशी स्थिती होती. अशा वातावरणामुळे नागरिक सर्दी, ताप, खोकला या आजाराने त्रस्त झाले होते. मात्र, मागील चार दिवसांत जिल्ह्याचे किमान तसेच कमाल तापमान कमी होत चालले आहे. यामुळे वातावरणात बदल होऊन पुन्हा थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे.जिल्ह्यात यंदाच्या हिवाळी ऋतूत आतापर्यंत कधीही किमान तापमान एकदम खालावले नाही. एकदाच महाबळेश्वरचा पारा १० अंशापर्यंत खाली आला होता. तर सातारा शहराचा कायम १२ अंशावर राहिला. मात्र, सोमवारी साताऱ्यात ११.०९ अंश किमान तापमानाची नोंद झाली. हे तापमान या ऋतूतील सर्वांत कमी ठरले. तर महाबळेश्वरचा पाराही ११ अंशापर्यंत खाली आला आहे. त्यातच शीतलहर असल्याने गारठा चांगलाच जाणवत आहे. यामुळे दुपारपर्यंत अंगातून थंडी जाता जात नाही, अशी स्थिती आहे. परिणामी, सकाळच्या सुमारास फिरणाऱ्यांची संख्या कमी होऊ लागली आहे.

सातारा शहरात किमान तापमान असे :दि. २८ डिसेंबर १६.०७, २९ डिसेंबर १६.०५, ३० डिसेंबर १६.०९, ३१ डिसेंबर १५.०३, १ जानेवारी १४.०९, २ जानेवारी १४.०५, ३ जानेवारी १४.०९, ४ जानेवारी १७.०४, ५ जानेवारी १७.०५, ६ जानेवारी १५, ७ जानेवारी १८.०६, ८ जानेवारी १४.०३ आणि ९ जानेवारी ११.०९

दोन दिवसांत पारा ६ अंशांनी घसरलासातारा शहरातील पारा दोन दिवसांपासून उतरत चालला आहे. अवघ्या दोन दिवसांत किमान तापमान ६ अंशांनी कमी झाले आहे. ७ जानेवारीला सातारा शहरात किमान तापमान १८.०६ अंश नोंद झाले. तर सोमवारी ११.०९ अंशापर्यंत खाली आले. तर महाबळेश्वरचे तापमान सोमवारी ११.०१ पर्यंत खाली आले. मात्र, शुक्रवारी १४ अंश होते. महाबळेश्वरचा पाराही घसरला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थानweatherहवामान