कोरोना लसीकरणासाठी सातारा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:08 IST2021-01-08T06:08:52+5:302021-01-08T06:08:52+5:30

सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे. पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. ८) प्रायोगिक ...

Satara ready for corona vaccination | कोरोना लसीकरणासाठी सातारा सज्ज

कोरोना लसीकरणासाठी सातारा सज्ज

सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे. पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. ८) प्रायोगिक तत्त्वावर लसीकरणाला सुरुवात होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी दिली. कोरोना लसीकरणाबाबत जिल्ह्यातील जनतेला उत्सुकता लागून राहिली होती, ती लवकरच संपणार आहे.

जिल्हाधिकारी म्हणाले, सातारा जिल्ह्यात कोरोनाचे एकूण ५५ हजार दोन रुग्ण आढळले आहेत. कोरोनामुळे १७९७ मृत्यू झाले. सुरुवातीपासून आतापर्यंत २ लाख ९१ हजार तपासणीसाठी नमुने घेतले. ऑगस्टपासून आयटीपीसीआर मशीनद्वारे टेस्टिंग सुरू आहे. सध्या आढावा घेतला तर रोज ५० ते ६० रोज केसेस येतात. त्यांची तपासणी करीत आहोत. कोविडसारखे लक्षण दिसले तर टेस्टिंगला पीएचसीमध्ये सोय आहे. खासगी दवाखान्यांत देखील सोय आहे. तपासणीसाठी बरेच पर्याय उपलब्ध आहे. कोविडवर लवकर उपचार झाले तर हा रोग लवकर बरा होता. उपचाराला उशीर केला तर धोका वाढतो. लवकर टेस्टिंग करावे. कोमॉर्बिड लोक ज्यामध्ये ६०च्या वरचे लोक त्यांनी विशेष काळजी घ्यावी. मास्कचा योग्य वापर, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझरचा वापर ही कोरोनापासून बचावाची साधने आहेत. लसीकरण दोन सिरम इन्स्टिट्यूटला मान्यता मिळाली आहे. लसीकरण हे १०० टक्के सुरक्षित आहे.

पहिल्या टप्प्यात अंगणवाडी, दुसऱ्या टप्प्यात गावपातळीवरील कर्मचारी, नगरपालिका कर्मचारी, तिसऱ्या टप्प्यात ६० वर्षांच्या पुढील लोकांचे लसीकरण केले जाणार आहे. शासन लवकरच लसीकरणाचा कार्यक्रम जाहीर करेल, त्यानंतर नोंदणी केलेल्या लोकांना लसीकरण केले जाणार आहे. पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्ह्यात तीन ठिकाणी लसीकरण केले जाणार आहे. तज्ज्ञ लोकांची यासाठी नेमणूक केली आहे. लसीकरण झाल्यानंतर अर्धा तास देखरेखीखाली ठेवणार आहे. खासगी आणि सरकारी आरोग्य अधिकारी व कर्मचारी २३ ते २४ हजार हेल्थकेअर वर्कर शासनाचा प्रोग्रॅम आला की कामाला सुरुवात होणार आहे.

कोरोना अपडेट

एकूण तपासलेले नमुने : २९१६२0

एकूण बाधित : ५५00२

घरी सोडण्यात आलेले : ५२४७६

मृत्यू : १७९७

उपचारार्थ रुग्ण : ७२९

कोट...

शासनाने कोरोना लसीकरणाची पूर्ण तयारी केलेली आहे. लसीकरणानंतरही विशेष काळजी घेतली जाणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांवर लसीकरण केले जाणार आहे, त्यांची माहिती संकलित करण्यात आलेली आहे. त्यातूनही खासगी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांची नावे राहिली असतील, तर त्यांनी नोंदणी करून घ्यावी.

- शेखर सिंग, जिल्हाधिकारी

आयकार्ड फोटो वापरावा

Web Title: Satara ready for corona vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.