सातारा-रहिमतपूर वाहतूक बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 13:45 IST2017-09-19T13:43:30+5:302017-09-19T13:45:55+5:30
पुणे-मिरज लोहमार्गावरील रहिमतपूर येथील रेल्वे फाटकाचे काम सुरू असल्याने ते सोमवारी सकाळी नऊ ते रात्री सात या वेळेत बंद असणार आहे. त्यामुळे सातारा-रहिमतपूर वाहतूक ठप्प करण्यात आली आहे.

सातारा-रहिमतपूर वाहतूक बंद
रहिमतपूर : पुणे-मिरज लोहमार्गावरील रहिमतपूर येथील रेल्वे फाटकाचे काम सुरू असल्याने ते सोमवारी सकाळी नऊ ते रात्री सात या वेळेत बंद असणार आहे. त्यामुळे सातारा-रहिमतपूर वाहतूक ठप्प करण्यात आली आहे.
वडूज, रहिमतपूर, आर्वी, पुसेसावळी परिसरातील शेकडो ग्रामस्थ प्रशासकीय कामानिमित्ताने साताºयाला जात असतात. आठवड्याचा पहिला दिवस असल्याने साहजिकच या दिवशी मोठ्या संख्येने लोक साताºयाला येतात. परंतु, त्यांची गैरसोय झाली आहे. याच मार्गावरून पुढे विटा, कडेगावची वाहतूक चालते. त्यावरही परिणाम झाला आहे.
साताºयाहून जाणाºयांना कोरेगावमार्गे जावे लागणार आहे. त्यामुळे दहा ते बारा किलोमीटरचे अंतर वाढत आहे. परंतु, यासंदर्भात प्रसारमाध्यमांमधून यापूर्वीच वृत्त प्रसिद्ध झालेले असल्याने एसटी वाहतूक कोरेगाव मार्गे वळविण्यात आली आहे.