थाई बॉक्सिंग स्पर्धेत साताऱ्याचा ठोसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:39 IST2021-03-16T04:39:28+5:302021-03-16T04:39:28+5:30
बावधन : थाई बॉक्सिंग असोसिएशन सातारा यांच्याअंतर्गत महिला दिनाचे औचित्य साधून घेण्यात आलेली आठवी विभागीय थाई बॉक्सिंग क्रीडा स्पर्धा ...

थाई बॉक्सिंग स्पर्धेत साताऱ्याचा ठोसा
बावधन : थाई बॉक्सिंग असोसिएशन सातारा यांच्याअंतर्गत महिला दिनाचे औचित्य साधून घेण्यात आलेली आठवी विभागीय थाई बॉक्सिंग क्रीडा स्पर्धा नुकतीच महाबळेश्वर येथे पार पडली. या स्पर्धेत साताऱ्याने प्रथम, कोल्हापूरने दि्वतीय, तर सांगलीच्या संघाने तिसरा क्रमांक पटकाविला.
स्पर्धेचे उद्घाटन नगरसेवक कुमार शिंदे, सुनील महांगडे, नितीन दौंड, विशाल शिर्के, संदीप महांगडे यांच्याहस्ते करण्यात आले. या स्पर्धेसाठी सात जिल्ह्यातील खेळाडूंनी सहभाग घेतला. स्पर्धेत प्रथम क्रमांक सातारा जिल्ह्याने, दि्वतीय क्रमांक कोल्हापूर जिल्हा व तृतीय क्रमांक सांगली जिल्ह्याने पटकाविला. यामध्ये मुलींच्या गटात सना शेख व मुलांच्या गटात शिवम येवले याने बेस्ट फायटरचा मान मिळविला.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ, पंचायत समिती सदस्या सुनीता कांबळे, अॅड. अमृता गाढवे, सफिया शेख, ज्योती शिर्के यांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्याहस्ते पारितोषिक देण्यात आले.
स्पर्धेसाठी पंच म्हणून वजीर शेख, विशाल वाडकर, आदिक पाटील, शामराव पाटील यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी पार पडण्यासाठी क्रीडाशिक्षक मुकुंद माळी, सुनील गुरव, प्रमोद निकम, अक्षय साळुंखे, अक्षय राजपुरे यांनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन रविराज गाढवे यांनी केले, तर सचिन लेंभे यांनी आभार मानले.
फोटो : १५ बॉक्सिंग फोटो
महाबळेश्वर येथे पार पडलेल्या बॉक्सिंग स्पर्धेचे उद्घाटन कुमार शिंदे व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.