शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : सार्वजनिक विश्वस्त कायद्यात ३६ वे भ्रष्ट कलम, कलम रद्द करण्याचा पुजारी महासंघाच्या सभेत ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 11:39 IST

सार्वजनिक विश्वस्त कायद्यातील कलम क्रमांक ३६ मुळे देवस्थान इनाम वर्ग ३ च्या बाबतीत अनेक ठिकाणी गैरगोष्टी घडल्या आहेत. ३६ वे कलम अनेकांच्या भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे. हे कलम रद्द करण्याचा ठराव पुजारी महासंघाचे अध्यक्ष नेताजी गुरव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत करण्यात आला.

ठळक मुद्देसार्वजनिक विश्वस्त कायद्यात ३६ वे भ्रष्ट कलम : नेताजी गुरव कलम अनेकांच्या भ्रष्टाचाराचे कुरण

सातारा : सार्वजनिक विश्वस्त कायद्यातील कलम क्रमांक ३६ मुळे देवस्थान इनाम वर्ग ३ च्या बाबतीत अनेक ठिकाणी गैरगोष्टी घडल्या आहेत. ३६ वे कलम अनेकांच्या भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे. हे कलम रद्द करण्याचा ठराव पुजारी महासंघाचे अध्यक्ष नेताजी गुरव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत करण्यात आला. या ठरावाची प्रत मुख्यमंत्र्यांना पाठविला आहे, अशी माहिती महासंघाचे संघटक शिवाजीराव गुरव यांनी दिली.मंदिर ही राज्यातील मोठी संस्था असल्याने मंदिर, मठ आणि इनाम वर्ग ३ बाबत विधिमंडळात चर्चा न होता, वटहुकूम निर्णय घेण्याचा प्रयत्न होऊ नये, अन्यथा महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनावर अनिष्ठ परिणाम होऊ शकतो, असे अनेक ठराव यावेळी करण्यात आले. 

मंदिरातील अनिष्ट रुढी आणि अंधश्रद्धा पसरविणाऱ्या प्रथा नष्ट करण्यासाठी पुजारी लोकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, मंदिरातील दानपेटीची व मौल्यवान वस्तूंची चोरी, मंदिराची मूळ ट्रस्ट सोडून वेगळीच योजना तयार करून मंदिरातील निधीचा गैरवापर, मंदिराच्या जागेत होणारे इतरांचे अतिक्रमण या विषयांवर तुकाराम गुरव, प्रदीप गुरव, सुहास गुरव, किसन क्षीरसागर, लक्ष्मण मेणवलीकर, अरविंद शेंडे, विजय गुरव, दयाराम पोरे, मारुती गुरव, दिनकर गुरव आदी कार्यकर्त्यांनी चर्चेत सहभाग घेतला.महासंघाचे कार्याध्यक्ष अरविंद गुरव यांनी प्रास्ताविक केले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र विभागीय मेळावा भरविण्याचा निर्णय घेण्यात आला. सचिव नारायणराव गुरव यांनी आभार मानले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरTempleमंदिर