शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

आधी पाणी मागितले, ग्लास फोडून स्वत:च्या गळ्यावर वार केले; सातारा पोलिस ठाण्यातील आरोपीचे कृत्य

By दत्ता यादव | Updated: February 27, 2024 14:04 IST

सातारा : तहान लागली म्हणून आरोपीनं  पोलिसांकडे पाणी मागितलं.  पोलिसांनी त्याला ग्लासमधून पाणी दिलं. पण तोच काचेचा ग्लास फोडून आरोपीनं काही क्षणात स्वत:च्या गळ्यावर वार केले. यात ...

सातारा : तहान लागली म्हणून आरोपीनं पोलिसांकडे पाणी मागितलं. पोलिसांनी त्याला ग्लासमधून पाणी दिलं. पण तोच काचेचा ग्लास फोडून आरोपीनं काही क्षणात स्वत:च्या गळ्यावर वार केले. यात संबंधित आरोपी जखमी झाला. ही धक्कादायक घटना सातारा तालुका पोलिस ठाण्यात सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शी उर्फ सूरज अनिल काळे (वय १९, रा. सांगळे वस्ती श्रीगोंदा, जि. अहमदनगर), असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, साताऱ्यातील एक व्यापारी डिसेंबर २०२३ मध्ये दुचाकीवरून सज्जनगडला निघाले होते. त्यावेळी त्यांना धाक दाखवून सूरज काळे याने त्यांच्या खिशातील १ लाख ५ हजारांची रोकड लंपास केली होती. या गुन्ह्यात सातारा शहर पोलिसांनी त्याला काही दिवसांपूर्वी अटक केली होती. गेल्या काही दिवसांपासून तो जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. दरम्यान, याच गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने सातारा तालुका पोलिसांनी सोमवारी दुपारी त्याला ताब्यात घेतले. दिवसभर त्याची चाैकशी तसेच कागदोपत्री सोपस्कार पार पाडले जात होते. पोलिस ठाण्यातील बीट अंमलदारांच्या शेजारील खोलीमध्ये त्याला ठेवण्यात आले होते. पोलिसांना त्याने पाणी पिण्यास मागितल्यानंतर त्याला ग्लासमधून पाणी देण्यात आले.मात्र, पोलिसांची नजर चुकवून त्याने काचेचा ग्लास फरशीवर आपटला. त्यानंतर फुटलेल्या ग्लासच्या तुकड्याने त्याने स्वत:च्या गळ्यावर वार केले. हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर त्याच्या हातातून काचेचा तुकडा पोलिसांनी हस्तगत केला. त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मंगळवारी सकाळी त्याला रुग्णालयातून सोडण्यात आले असून, त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. सध्या त्याला जिल्हा कारागृहात पुन्हा ठेवण्यात आले आहे. सातारा तालुका पोलिस ठाण्यात रात्री अकरा वाजता सूरज काळे याच्यावर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

ग्लास तातडीने बदललेकाचेच्या ग्लासने आरोपीने स्व:च्या गळ्यावर वार करून घेतल्याने पोलिसांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. पोलिसांनी याची तातडीने दखल घेऊन पोलिस ठाण्यात काचेच्या ग्लास ऐवजी स्टीलचे ग्लास आणले.  

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस