शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळालेल्या आरोपी सापडला, पुण्यामध्ये कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 12:56 IST

सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारातून पळून गेलेल्या आरोपीला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना पुण्यामध्ये यश आले. त्यामुळे सातारा पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. विसृत रामचंद्र नवाते (वय ३०, रा. केसरकर पेठ, सातारा) असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

ठळक मुद्देपोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळालेल्या आरोपी सापडलापुण्यामध्ये कारवाईपोलिसांकडून सुटकेचा नि:श्वास

सातारा : जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारातून पळून गेलेल्या आरोपीला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना पुण्यामध्ये यश आले. त्यामुळे सातारा पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. विसृत रामचंद्र नवाते (वय ३०, रा. केसरकर पेठ, सातारा) असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.जिल्हा शासकीय रुग्णालयातील प्रिझन वॉर्डमध्ये पंधरा दिवसांपूर्वी नवातेवर उपचार सुरू होते. त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली तरी त्याला कारागृहात नेण्यात आले नव्हते. यासंदर्भात लोकमतने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर त्याला दुसऱ्या दिवशी कारागृहात नेण्यात येत होते. यावेळी त्याने जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर असलेल्या एका हॉटेलमध्ये पाणी पिण्याचा बहाणा करून पोलिसाच्या हाताला हिसका देऊन पलायन केले होते.

गेल्या काही दिवसांपासून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्याचा शोध घेत होते. पुण्यामध्ये नवाते असल्याची माहिती मिळाल्यानंतर एक पथक शनिवारी रात्री तेथे गेले. एका मित्राच्या घरामध्ये तो सापडल्याचे एका पोलिसाने सांगितले.दरम्यान, नवाते पळून गेल्यानंतर पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी हलगर्जीपणाचा ठपका ठेवत एका पोलीस कर्मचाऱ्याला निलंबितही केले होते.विसृत नवातेवर सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, पुणे येथे विविध प्रकारचे फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. महिनाभरापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेने त्याला साताऱ्यात शिताफीने अटक केली होती. नवाते पळून गेल्यानंतर पुन्हा याच पथकाने त्याला अटक केली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrimeगुन्हा