शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अखेर बंडातात्या कराडकर सातारा पोलिसांच्या ताब्यात, वादग्रस्त वक्तव्य भोवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 14:07 IST

बंडातात्या यांनी या आंदोलन दरम्यान मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यावर ‘ढवळ्याशेजारी बांधला पावळ्या.. वाण नाही पण गुण लागला'' अशा शब्दात टीकास्त्र सोडले होते.

सातारा : राज्य शासनाच्या सुपर मार्केटमधील वाईन विक्री धोरणाविरोधात कोरोना नियमांचे उल्लंघन करुन आंदोलन केल्याप्रकरणी बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शुक्रवारी सकाळी फलटण तालुक्यातील पिंप्रदला ही कारवाई करण्यात आली.त्यानंतर बंडातात्या कराडकर यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात आणण्यात आले.  यावेळी शहर पोलीस स्टेशनला छावणीचे स्वरूप आले होते.

दरम्यान, राष्ट्रवादी महिला व काँग्रेस महिलांच्यावतीने पोवई नाक्यावर बंडातात्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले.

याबाबत माहिती अशी की, राज्य शासनाने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय घेतला आहे. याला अनेक ठिकाणी विरोध होत आहे. साताऱ्यातही गुरुवारी व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने दंडवत आंदोलन झाले. हे आंदोलन बंडातात्या कराडकर यांच्या नेतृत्वाखाली झाले. या आंदोलनादरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठी गर्दी झाली होती. तसेच यावेळी बंडातात्या यांनी राजकीय नेत्यांविरोधात जोरदार टीका केली होते. 

यावेळी त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात राज्यभरातून रोष व्यक्त करण्यात येत आहे. तर साताऱ्यातील या आंदोलनप्रकरणी कोरोना नियमांचे उल्लंघन करत व जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी बंडातात्या कराडकर यांच्यासह सुमारे १२५ जणांवर साथरोग अधिनियम ३ तसेच इतर कलमाखाली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.  दरम्यान, साताऱ्यातील या आंदोलनानंतर बंडातात्या निघून गेले होते. साताऱ्यातील वक्तव्याप्रकरणी पोलीस त्यांची चौकशी करणार अशी पोलीसदलात चर्चा सुरु होती. असे असतानाच शुक्रवारी सकाळी फलटण तालुक्यातील पिंप्रद येथे व्यसनमुक्त युवक संघाच्या कार्यालयातून बंडातात्या कराडकर यांना सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना साताऱ्यात आणण्यात येत आहे.बंडातात्या कराडकर यांनी या आंदोलन दरम्यान मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यावर ‘ढवळ्याशेजारी बांधला पावळ्या.. वाण नाही पण गुण लागला'' अशा शब्दात टीकास्त्र सोडले होते. तर  सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे यांच्यावर अगदी खालच्या पातळीवर जाऊन त्यांच्यावर टीका केली होती. अखेर त्यांना हे वादग्रस्त प्रकरण भोवले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी