शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
4
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! ब्रोकरेज फर्मकडून 'या' ५ शेअर्सना खरेदीचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
5
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
6
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
7
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
8
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
9
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
10
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
11
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
12
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
13
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
14
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
15
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
16
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
17
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
18
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
19
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा

सातारा : अवघ्या २३ दिवसांत ३ हजार डंपर गाळ बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 12:20 IST

वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या खटाव तालुक्यातील अनपटवाडी गावात रात्रंदिवस जलसंधारणाचं काम सुरू आहे. गावातीलच एका तलावातून २३ दिवसांत ३ हजार डंपर इतका गाळ काढण्यात आला असून, यामुळे माळरानावरील ५० एकर क्षेत्र बागायती तयार झाले आहे. तर संपूर्ण गाळ काढण्याने सुमारे सात कोटी लिटर एवढा पाणीसाठा वाढणार आहे.

ठळक मुद्देअवघ्या २३ दिवसांत ३ हजार डंपर गाळ बाहेरसात कोटी लिटर पाणीसाठा वाढणार खटावमधील अनपटवाडीत रात्रंदिवस काम सुरू

नितीन काळेलसातारा : वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या खटाव तालुक्यातील अनपटवाडी गावात रात्रंदिवस जलसंधारणाचं काम सुरू आहे. गावातीलच एका तलावातून २३ दिवसांत ३ हजार डंपर इतका गाळ काढण्यात आला असून, यामुळे माळरानावरील ५० एकर क्षेत्र बागायती तयार झाले आहे. तर संपूर्ण गाळ काढण्याने सुमारे सात कोटी लिटर एवढा पाणीसाठा वाढणार आहे.खटाव तालुक्यातील अनपटवाडी गावाने पाणीदार होण्याचे ठरविले आहे. त्यातूनच करुंज बेंद नावाच्या पाझर तलावातून गाळ काढण्याचे काम सुरू झालं आहे. शासनाची गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना त्यासाठी फायदेशीर ठरली आहे. अनुलोमच्या माध्यमातून गावातील तलावातील गाळ काढण्यात येत आहे. अनुलोमचे जनसेवक श्रेयस काणे आणि सामाजिक कार्यकर्ते मेघराज निकम यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू आहे.मे महिन्याच्या ऐन उन्हाळ्यात तलावातील गाळ काढणीस प्रारंभ झाला. त्यावेळी तलावातील गाळ हा १०० टक्के काळं सोनं असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर हा गाळ शेतकऱ्यांनी जवळच्या माळरानावर पसरवला. ज्या ठिकाणी जनावरे चरत होती, अशा सुमारे ५० एकर क्षेत्रावर गाळ टाकण्यात आला.

यामुळे ३० हून अधिक शेतकऱ्यांच्या माळरानाचे आता बागायती क्षेत्रात रुपांतर होत आहे. तर आतापर्यंतच्या २३ दिवसांत सुमारे ३ हजार डंपर गाळ काढण्यात आला आहे. त्यामुळे पाणीसाठा वाढणार आहे.

तलावातून दररोज सरासरी १७५ डंपर गाळ काढण्यात येत असून, पोकलेन मशीनसाठी शासनाच्या वतीने इंधन पुरवठा करण्यात येत आहे. तर गाळ वाहतुकीचा खर्च शेतकऱ्यांना करावा लागत आहे. सध्या कामाच्या ठिकाणी सहा डंपर, दोन पोकलेन कार्यरत असून, पाऊस नाही पडला तर किमान तीन महिने हे काम चालणार आहे.तलावात वीस फुटांवर होता गाळगावाची लोकसंख्या सुमारे ६००गावातील ऐकूण क्षेत्र १६०० हेक्टरतलावाची निर्मिती १९७० च्या दरम्यानतलावात २० फुटाच्यावर गाळ साठलेलानवीन जमिनीत तीन फूट गाळाचा थर 

गाव तलावातील गाळ मोठ्या प्रमाणात काढण्यात येत आहे. त्यामुळे किमान सात कोटी लिटर एवढा पाणीसाठा वाढणार आहे. परिसरातील शेकडो एकर क्षेत्राला फायदा होणार आहे.- भगवान भोसले,माजी सरपंच

टॅग्स :Satara areaसातारा परिसरJalyukt Shivarजलयुक्त शिवारGovernmentसरकारWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा