शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Satara News: वडूज कचरा संकलन केंद्रात आगीचा भडका, घटनास्थळी अग्निशमन दल दाखल

By जगदीश कोष्टी | Updated: February 27, 2023 16:39 IST

शेखर जाधव वडूज: शहरातील कचरा संकलन केंद्र हलवून काही महिने लोटण्यापूर्वींच कचरा संकलन केंद्रामध्ये आगीचा भडका उडाला. आगीची माहिती ...

शेखर जाधववडूज: शहरातील कचरा संकलन केंद्र हलवून काही महिने लोटण्यापूर्वींच कचरा संकलन केंद्रामध्ये आगीचा भडका उडाला. आगीची माहिती समजताच नगरपंचायत प्रशासन खडबडून जागे झाले आणि काही तासांतच म्हसवड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली. या आगीमुळे कोणतीही ही जीवितहानी झाली नाही. मात्र परिसरात धुराच्या लोढ्यांने प्रदूषण वाढले.नगरपंचायत स्वमालकीच्या जागेतील पूर्वीचे कचरा संकलन केंद्र लोकवस्ती शेजारी असलेल्या जागेत होते. कचरा निर्मूलन, बायोमायनिंगबाबत नगरपंचायतीची उदासीनता या कारणाने कचरा जास्त साठत होता. त्याठिकाणी सर्वच प्रकारचा कचरा साठल्याने ढिगारे निर्माण झाले होते. प्रसंगी त्याठिकाणी अचानक लागलेल्या आगीमुळे धुपत असलेल्या कचऱ्यामधून धुरांचे लोंढे दोन-तीन दिवस परिसरातील नागरिकांचे जिणे मुश्कील करायचे. त्याकारणाने तेथील नागरिकांच्या अनेक वर्षांच्या तक्रारीमुळे त्या जागेतून कचरा संकलन केंद्र हलवून भाडेतत्त्वावरील जागेत हे संकलन केंद्र हलविले. परंतु शहरापासून पाच किलोमीटर अंतरावरील या संकलन केंद्राजवळ हिंगणे गाव आणि शहरातीलच लोकवस्ती तुरळक आहे. हे संकलन केंद्र सुरू झाल्यापासून हिंगणे ग्रामस्थांनी तहसीलदार, नगरपंचायत प्रशासनाला हे केंद्र हलविण्यासाठी लेखी निवेदन देऊन ही याबाबत ठोस उपाययोजना करण्यात आली नाही. कुबट वास व मांसल पदार्थाचे खरकटे या कचरा संकलन केंद्रामध्ये समाविष्ट होत असल्याने मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट या परिसरात दहशत निर्माण करीत आहे. या मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात गत महिन्यात एका गरीब कुटुंबातील शेतकऱ्यांच्या दावणीला असलेली तीन बकऱ्या मरण पावल्या होत्या. यावर हिंगणे ग्रामस्थांनी न्याय हक्कासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे धाव घेतली. यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने देखील या संदर्भात लेखी निवेदन देऊन गर्भित इशाराही दिला होता.हा साचलेला कचरा बायोमायनिंग करण्यासाठी आजच पुणे येथील वाहने येऊन घेऊन जाणार होती. परंतु तत्पूर्वीच कचरा संकलन केंद्रामध्ये आग लागून सर्वच कचरा बेचिराख झाला. घटनास्थळी नगरपंचायत अधिकारी व कर्मचारी यांची तातडीने आग आटोक्यात आणण्यासाठी धडपड सुरू आहे. तर नेमकी ही आग लागली की लावली हा विषय अनुत्तरित आहे. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसर