शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

Satara: माऊलींच्या पादुकांचे नीरा स्नान उत्साहात, लाखो भाविकांची उपस्थिती, वैष्णवांचा मेळा लोणंदनगरीत विसावला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2023 4:29 PM

Ashadhi Wari: लाडक्या विठुरायाला डोळे भरून पाहण्यासाठी पंढरीच्या दिशेने निघालेला वैष्णवांचा मेळा रविवारी दुपारी सातारा जिल्ह्यात आला. या वारीतील महत्त्वाचे असलेल्या माऊलींच्या पादुकांना नीरा स्नान घालण्यात आले.

- संतोष खरातलोणंद : लाडक्या विठुरायाला डोळे भरून पाहण्यासाठी पंढरीच्या दिशेने निघालेला वैष्णवांचा मेळा रविवारी दुपारी सातारा जिल्ह्यात आला. या वारीतील महत्त्वाचे असलेल्या माऊलींच्या पादुकांना नीरा स्नान घालण्यात आले.

वाल्हे मुक्कामानंतर सकाळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याने निरेकडे प्रस्थान झाले. दुपारच्या न्याहारीनंतर सोहळ्याने सातारा जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी माऊलींच्या पादुकांचे नीरा दत्तघाटावर स्नान घालण्यात आले. माऊलींच्या पादुकांना नीरा नदीवर स्नान घालण्याची ७०० वर्षांची परंपरा आहे. त्यानुसार रविवारी दुपारी दीडच्या सुमारास माऊलींची पालखी नीरा नदीवरील दत्तघाटावर आली. त्यानंतर अवघा दत्तघाट परिसर माऊलींच्या जयघोषाने दुमदुमला. यावेळी हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली होती. हा सोहळा सुरू असताना वारकऱ्यांच्या आनंदाला उधान आले होते.

हरिनामाच्या जयघोषात आणि टाळ मृदंगांच्या गजरात माऊलींच्या पादुकांना नीरा नदीत स्नान करून संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांची पालखीचे दुपारी मोठ्या आनंदाने भक्तिमय वातावरणात सातारा जिल्ह्यात आगमन झाले. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पाडेगाव येथे सातारा जिल्ह्यात पालखी सोहळ्याने प्रवेश करताच सातारा जिल्ह्याच्या वतीने सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलिस अधीक्षक समीर शेख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, खंडाळ्याचे तहसीलदार अनिल पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव, विराज शिंदे, माजी समाज कल्याण सभापती आनंदराव शेळके-पाटील, लोणंदचे उपनगराध्यक्ष शिवाजीराव शेळके-पाटील, खंडाळा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सरफराज बागवान, तारीक बागवान, पाडेगावचे सरपंच यांनी स्वागत केले.

प्रथमच सशस्त्र सलामीयावेळी प्रथमच सातारा पोलिस दलातर्फे माऊलींच्या सशस्त्र सलामी देण्यात आली. जिल्हा पोलिस बँड पथकाच्या वतीने विठ्ठल विठ्ठलची धून सादर करून माऊलींना संगीतमय सलामी देण्यात आली.

हरिभजनात तल्लीननीरा नदीतील स्नानाने ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने जिल्ह्यात प्रवेश केला. पाडेगाव येथे लाखो भाविकांनी माऊलींचे दर्शन घेतले. फडफडणाऱ्या भगव्या पताका, टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामात, हरिभजनात तल्लीन होऊन वारकरी नाचत होते. भाविकांच्या प्रचंड उत्साहाने माऊलींचा पालखी सोहळा भक्तरसात चिंब होऊन गेला होता.

टॅग्स :ashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022Pandharpur Wariपंढरपूर वारीSatara areaसातारा परिसर