शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

दुर्दैव! लग्नाच्या काही तासांपूर्वीच नवरदेवाचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 15:56 IST

लग्नाला काही तास उरले असतानाच कोरेगाव येथील एका नियोजित वराचा ट्रॅक्टर ट्रॉलीने दिलेल्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. गणेश विश्वासराव बर्गे (वय २४, रा. कोरेगाव) असे मृत्यू झालेल्या वराचे नाव आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. ​​​​​​​

ठळक मुद्देलग्नाच्या काही तासांपूर्वीच नवरदेवाचा दुर्दैवी मृत्यू कोरेगाव येथे ट्रॅक्टर ट्रॉलीची धडक

कोरेगाव : लग्नाला काही तास उरले असतानाच कोरेगाव येथील एका नियोजित वराचा ट्रॅक्टर ट्रॉलीने दिलेल्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. गणेश विश्वासराव बर्गे (वय २४, रा. कोरेगाव) असे मृत्यू झालेल्या वराचे नाव आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कोरेगाव येथील गणेश बर्गे यांचा बुुधवार, दि. २१ रोजी सायंकाळी कोरेगाव येथे विवाह होणार होता. दोन्ही पक्षांकडील मंडळींची विवाहाची तयारी जवळपास पूर्ण झाली होती. दरम्यान, गणेश बर्गे हे बुधवारी सकाळी फिरण्यासाठी घराबाहेर पडले होते.

कोरेगाव मार्केट यार्ड नजीक असलेल्या सातारा-पंढरपूर रस्त्याकडे ते गेले होते. या ठिकाणी रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करीत असतानाच अचानक समोरून आलेल्या उसाच्या ट्रॉलीने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत गंभीर दुखापत झाल्याने गणेश बर्गे यांचा जागीच मृत्यू झाला. लग्नाला काही तास उरले असताना बर्गे यांच्यावर काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघात