शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : कालवडेत एकाचा निर्घृण खून, गावात खळबळ : खिंडीत आढळला मृतदेह; पोलिसांकडून कसून तपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 14:10 IST

कालवडे, ता. कऱ्हाड येथे रस्त्यालगत एकाचा संशयास्पद मृतदेह आढळून आला आहे. संबंधिताचा खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसत असून, त्यादृष्टीने पोलिस तपास करीत आहेत.

ठळक मुद्देकालवडेत एकाचा निर्घृण खून, गावात खळबळ खिंडीत झाडीत आढळला महिलेचा मृतदेह कऱ्हाडच्या पोलिसांकडून कसून तपास

कऱ्हाड : कालवडे, ता. कऱ्हाड येथे रस्त्यालगत एकाचा संशयास्पद मृतदेह आढळून आला आहे. संबंधिताचा खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसत असून, त्यादृष्टीने पोलिस तपास करीत आहेत.बबन हिंदुराव गाडे (रा. कालवडे, ता. कऱ्हाड ) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कालवडे ते नांदगाव जाणाºया रस्त्यावर डोंगरातील खिंडीत एकाचा मृतदेह पडला असल्याची माहिती शुक्रवारी सकाळी ग्रामस्थांनी पोलिसांना दिली.

माहिती मिळताच कऱ्हाड तालुका पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी चौकशी केली असता संबंधित व्यक्तीची ओळख पटली. त्याचे नाव बबन गाडे असल्याचे ग्रामस्थांनी पोलिसांना सांगितले.

गाडे यांच्या अंगावर मोठ्या प्रमाणात जखमा आहेत. तसेच गुरुवारी रात्री दोघांनी त्यांना घरातून बोलावून नेले होते. त्यानंतर ते घरी परत आले नाहीत. शुक्रवारी सकाळी त्यांचा मृतदेहच आढळून आला, असे नातेवाइकांचे म्हणणे आहे.मृतदेहावर असलेल्या जखमा व नातेवाइकांकडून मिळालेल्या माहितीनुसार बबन गाडे यांचा खून झाला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यानुसार तपास केला जात आहे.

दुपारी गाडे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कऱ्हाडच्या उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. पोलिस अधीक्षक संदीप पाटील, उपअधीक्षक नवनाथ ढवळे, निरीक्षक अशोक क्षीरसागर यांच्यासह गुन्हे शाखेच्या पथकाकडून घटनास्थळी तपास करण्याचे काम सुरू आहे.झाडीत आढळला महिलेचा मृतदेहकालवडे येथे खुनाची घटना समोर आली असताना आटके गावच्या हद्दीत एका महिलेचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला आहे. संबंधित महिलेचे वय सुमारे ३५ वर्षे असून, तिच्या अंगात सलवार, कुर्ता आहे.

तिचा मृत्यू आठ ते दहा दिवसांपूर्वी झाला असावा, असा पोलिसांचा कयास आहे. आटके गावच्या हद्दीत पाचवडेश्वर शिवारात झाडीमध्ये हा मृतदेह आढळून आला आहे. महिलेची ओळख पटविण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

टॅग्स :MurderखूनSatara areaसातारा परिसर