शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

Satara: पावसाळा संपला; सातारा जिल्ह्यात गतवर्षीच्या दुप्पट बरसला, यंदा १२७ टक्के पाऊस

By नितीन काळेल | Updated: October 1, 2024 20:34 IST

Satara News: सातारा जिल्ह्यात गतवर्षीचा दुष्काळ संपवत यंदा वरुणराजाने विक्रम करत गतवर्षीच्या दुप्पट हजेरी लावली. त्यामुळे पावसाळ्यातील चार महिन्यात सरासरीच्या १ हजार १२४ मिलिमीटर पाऊस झाला. तसेच यंदा १२७ टक्के पर्जन्यमान झाले असून यामध्ये दुष्काळी तालुके आबादानी झाले आहेत.

- नितीन काळेल सातारा - जिल्ह्यात गतवर्षीचा दुष्काळ संपवत यंदा वरुणराजाने विक्रम करत गतवर्षीच्या दुप्पट हजेरी लावली. त्यामुळे पावसाळ्यातील चार महिन्यात सरासरीच्या १ हजार १२४ मिलिमीटर पाऊस झाला. तसेच यंदा १२७ टक्के पर्जन्यमान झाले असून यामध्ये दुष्काळी तालुके आबादानी झाले आहेत.

जिल्ह्यात जून ते सप्टेंबर दरम्यान मान्सूनचा पाऊस पडतो. या चार महिन्यातील पावसावरच वर्षभराचे गणित अवलंबून असते. पण, गेल्यावर्षी अपुरा पाऊस झालेला. त्यामुळे दुष्काळी स्थिती उद्भवली होती. मात्र, यावर्षी जून महिन्यापासूनच जिल्ह्यात धुवाॅधार पाऊस सुरू झाला. त्यामुळे मागील चार महिन्यातील पावसाने रेकाॅर्ड ब्रेक केला आहे. आता पावसाळा संपला असून यंदा गतवर्षीच्या दुप्पट पाऊस पडला आहे. यामध्ये पाटण तालुक्यात १०० टक्क्याला थोडास कमी पाऊस झाला. तर महाबळेश्वरला सरासरीच्या सुमारे ७२ टक्केच पर्जन्यमान नोंद झाले. तर जिल्ह्यातील इतर सर्वच तालुक्यात सरासरीच्या १०० टक्क्यांहून अधिक पाऊस झालेला आहे. 

 जिल्ह्याची वार्षिक सरासरी ८८६.२ मिलिमीटरयंदा पाऊस झाला १,१२४ मिलिमीटरयंदाची टक्केवारी १२६.८

 तालुकानिहाय झालेला पाऊस आणि टक्केवारीसातारा १,०५८.८          १३९जावळी १,९९३.२          १४९.३पाटण १,६०२.९            ९९.५कऱ्हाड ९८४.२             १६७.५कोरेगाव ८८०.१             १४०.७खटाव ६८४.२                १७०.९माण ५११.२                    १२१.६फलटण ५५४.८             १४८.४खंडाळा ५६९.३             १४३.७वाई १,०१९.८                 १४४.४महाबळेश्वर ३,८९४.३      ७१.६ मागील वर्षी सरासरी ६५ टक्के पर्जन्यमान जिल्ह्यातील मागीलवर्षी पर्जन्यमान कमी होते. वार्षिक सरासरीच्या ६५.२ टक्के म्हणजे ५७८ मिलिमीटरची नोंद झाली होती. यामध्ये सर्वच तालुक्यात कमी पाऊस झालेला. सातारा आणि जावळी तालुक्यात ७५ टक्के, पाटणला ६४, कऱ्हाड ५६, कारेगाव ४८, खटाव ६८, माणमध्ये ६१, फलटणला ४९, खंडाळा तालुक्यात ५२, वाई ६३ तर महाबळेश्वर तालुक्यात ५३ टक्के पाऊस झाला होता.

टॅग्स :RainपाऊसSatara areaसातारा परिसरMonsoon forecastमोसमी पावसाचा अंदाज