शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
2
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
3
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
5
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
6
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
7
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?
8
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
9
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
10
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
11
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
12
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड
13
IPO News: १८ सप्टेंबरला उघडणार 'या' कंपनीचा ५६०.२९ कोटी रुपयांचा IPO; काय आहेत डिटेल्स?
14
अंत्ययात्रा काढली, चितेवर ठेवलं, पण मुखाग्नी देणार तोच जिवंत झाली महिला, आता अशी आहे प्रकृती
15
इंदिरा एकादशी २०२५: पितरांना मोक्ष देणारी इंदिरा एकादशी; तुळशीचा 'असा' वापर आठवणीने टाळा
16
'श्रीयुत गंगाधर टिपरे' मालिकेचा इंटरेस्टिंग किस्सा, आबांच्या भूमिकेतील दिलीप प्रभावळकर म्हणाले...
17
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
18
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
19
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
20
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video

"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली

By ओमकार संकपाळ | Updated: April 29, 2024 13:55 IST

Satara Lok Sabha Election 2024: साताऱ्यात उदयनराजे भोसले विरूद्ध शशिकांत शिंदे अशी थेट लढत होणार आहे. 

Udayanraje Bhosale | सातारा : सातारा लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा उदयनराजे भोसले भाजपकडून आपले नशीब आजमवत आहेत. यावेळी त्यांच्यासमोर महाविकास आघाडीच्या शशिकांत शिंदे यांचे आव्हान आहे. कधीकाळी एकमेकांसाठी मत मागणारे शरद पवारांचे हे दोन्ही शिलेदार आता लोकसभेला एकमेकांविरोधात लढत आहेत. पण, लोकसभेला प्रथमच 'घड्याळा'ची कमी असल्याने याचा फटका आणि फायदा कोणाला होतो हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल. यावेळी सातऱ्यात तुतारी विरूद्ध कमळ अशी थेट लढत होणार आहे. या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी 'लोकमत' व्हिडीओचे संपादक आशिष जाधव यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी सातारच्या विकासाचा पाढा वाचताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष कौतुक केले. 

उदयनराजे भोसले म्हणाले की, उमेदवारीबाबत माझ्या मनात शंका नव्हती. वेळ लागला असला तरी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह इतर मित्रपक्षांसोबतच्या चर्चेत वेळ जातच असतो. आम्ही नुकताच संकल्पनामा जाहीर केला आहे. १० हजार कोटी रूपयांची कामे माझ्या माध्यमातून झाली आहेत. तसेच खासदार झाल्यावर काय रोडमॅप असेल यावर त्यांनी सांगितले की, नमो गंगाचे जसे शुद्धीकरण झाले त्याच पद्धतीने नमो कृष्णाचे शुद्धीकरण झाले पाहिजे. पाणी दूषित होऊन काही होऊ नये आणि लोकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी प्रयत्न करणार आहे. 

दरम्यान, उदयनराजेंच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कऱ्हाड येथे प्रचारसभा घेणार आहेत. मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात केले आहेत. विकासाच्या माध्यमातून ते आचरणात आणले आहेत. केंद्रात आणि राज्यात चांगले काम होत आहे. मोदींचे माझ्यावरच नाही तर सर्वांवर लक्ष असल्याचे उदयनराजेंनी सांगितले. तुमच्यासमोर तुतारी वाजेल का यावर उदयनराजे म्हणाले, "आमच्या इथे आधीपासूनच तुतारी वाजत आली आहे, आजही लग्नकार्यात तुतारी वाजवली जाते. पण, निवडणुकीत चित्र काहीसे वेगळे आहे. मविआच्या उमेदवाराने एवढे घोटाळे करूनही तुतारी वाजणार का असे विचारले जाते. ती तुतारी कशी वाजेल? वाजणारच नाही. ते आपले स्वत:चे घोटाळे लपवण्यासाठी इतरांवर आरोप करत आहेत. हे त्यांचे ब्रीदवाक्यच आहे."

कॉलरचा किस्सा 

तसेच शरद पवार कॉलर उडवत आहेत, ते माझी स्टाईल करून मी चांगले काम करत असल्याचे सांगत आहेत. ते कॉलर उडवून याचे संकेत देत आहेत. त्यांना देखील माहिती आहे की, आपल्या पक्षाने चुकीचा उमेदवार दिलाय. मी मित्र मंडळीसोबत बसलो असताना कॉलर उडवण्याचा किस्सा घडला. रविवारचा दिवस होता बॉलिवूड आणि हॉलिवूडबद्दल गप्पा रंगल्या होत्या. मग राजकारणाचा विषय निघाला तेव्हा पॉलिटिक्सचा 'पॉलिवूड' अशी चर्चा झाली. तेव्हा मी बोललो की पॉलिटिक्स म्हणजे पॉलिवूड... फरक फक्त एवढाच की तिकडे रिटेक घेता येतो इथे नाही. एकतर इन नाही तर आऊट असे इथे असते. राज्याचे पॉलिवूड झालंय असे मी म्हणत नाही. पण, काही लोकप्रतिनिधी लोकांकडे दुर्लक्ष करतात, घोटाळे करतात. कुणी काय कमावले हे मला माहिती नाही पण मी लोकांचा विश्वास कमावला असून, यात मी समाधानी आहे, असेही उदयनराजेंनी नमूद केले.

ते आणखी म्हणाले की, सात तारखेला मतदान होत आहे ही केवळ औपचारिकता आहे. आताच निकाल लागल्यात जमा आहे. त्यानंतर आमदारकीची निवडणूक होईल. सातारा लोकसभा मतदारसंघातील सर्व सहा विधानसभेच्या जागा महायुती जिंकेल असा मला विश्वास आहे. मागील वेळी मताचे विभाजन झाल्यामुळे काही जागा इकडे तिकडे झाल्या पण यावेळी महायुतीचा विजय निश्चित आहे. 

उदयनराजेंनी सांगितली चूक

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे राष्ट्रवादीच्या तिकिटावर खासदार झाले. पण अवघ्या सहा महिन्यात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत राजीनामा दिला. मग विधानसभा निवडणुकीसोबत लोकसभेची पोटनिवडणूक झाली अन् राजेंना पराभव पत्करावा लागला. भाजपच्या कमळ चिन्हावर लढलेल्या उदयनराजेंना राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी पराभूत केले. याबद्दल बोलताना राजेंनी आपल्या चुकीची कबुली दिली आहे. ते म्हणाले की, मी राजीनामा देणार होतो हे निश्चित होते. मात्र, मी माझ्या लोकसभा मतदारसंघातील विधानसभा क्षेत्रातील ज्येष्ठ सहकाऱ्यांना विचारात न घेता निर्णय घेतला. तसे केले नसते तर पोटनिवडणुकीत देखील विजय झाला असता. पण, मी देखील एक माणूस आहे आणि माझ्याकडून ती एक मोठी चूक झाली. पण यातून मी खूप काही शिकलो आहे.

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेsatara-pcसाताराlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Shashikant Shindeशशिकांत शिंदेSharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदी