शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
2
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
3
घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?
4
1 जुलैपासून नवा कोच राहुल द्रविडची जागा घेणार; बीसीसीआयने अर्ज मागविले, या अटी ठेवल्या....
5
इराणचं चाबहार बंदर भारताच्या ताब्यात; अमेरिकेला मिरची झोंबली, चीन-पाकलाही धक्का
6
होर्डिंग पडलेल्या ठिकाणीच नेते भिडले! संजय दिना पाटील किरीट सोमय्यांवर भडकले
7
'घोटाळ्याच्या चौकशीसाठी भुजबळांनी...';राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट मोदींना लिहीलं पत्र
8
पेट्रोल भरायला आला अन् काळाने घात केला; घाटकोपर दुर्घटनेत युवकाचा दुर्दैवी अंत
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; श्रीराम फायनान्सचे शेअर्स वधारले, सिप्लाच्या शेअरमध्ये घसरण
10
EPFO ची कोट्यवधी लोकांसाठी गूड न्यूज! घर, लग्न, आजार, शिक्षणासाठी ऑटो क्लेम सोल्युशन लाँच; पाहा
11
सावत्र लेक दिया मिर्झाला म्हणत नाही आई, अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली- "ती मला..."
12
पीओकेमधील गोंधळामुळे पाकिस्तान सरकारने गुडघे टेकले! २३ अब्ज रुपयांचा निधी जाहीर
13
LICची लखपती स्कीम! केवळ रोज ₹४५ रुपये जमा करून मिळवू शकता ₹२५ लाख; पाहा संपूर्ण डिटेल
14
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
15
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
16
ईशा गुप्ताने केले आहेत Eggs Freeze, म्हणाली- "मी आज ३ मुलांची आई असते, पण..."
17
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
18
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
19
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
20
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले

सातारा : बिबट्या एकीकडे; पिंजरा दुसरीकडे!, दशहत कायम : मोरणा विभागात वाढला वावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 11:08 AM

मोरणा विभागातील कुसरुंड, नाटोशी, वाडीकोतावडे या गावांमध्ये काही दिवसांपासून बिबट्याने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला आहे. मात्र, बिबट्या एकीकडे आणि पिंजरा दुसरीकडे अशी परिस्थिती आहे.

ठळक मुद्दे वाडीकोतावडे, आंब्रग विभागात रोज प्राण्यांवर हल्ले बिबट्याने घातला चांगलाच धुमाकूळ मजुरांचा तुटवडा त्यात बिबट्याची भीती

पाटण : मोरणा विभागातील कुसरुंड, नाटोशी, वाडीकोतावडे या गावांमध्ये काही दिवसांपासून बिबट्याने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला आहे. मात्र, बिबट्या एकीकडे आणि पिंजरा दुसरीकडे अशी परिस्थिती आहे.मोरणा विभागात गेले काही दिवस बिबट्याने धुमाकूळ घातला होता. वाडीकोतावडे, आंब्रग या विभागात रोज पंधरा दिवस शेळी, गाय, म्हैस आदी प्राण्यांवर हल्ले होत होते.

बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागच्या वतीने सापळाही लावण्यात आला होता. मात्र, पिंजरा लावल्यानंतर बिबट्याने हा परिसरत सोडून बाजूला असणाऱ्या नोटोशी, कुसरुंड, आडदेव या परिसरात मोर्चा वळविला आहे.

परिसरात सकाळ, सायकांळी आणि रात्री बिबट्याचे दर्शन होत आहे. दोन दिवसांपूर्वी कुसरुंड-नाटोशी रस्त्यावर डॉ. प्रकाश वरेकर हे कुसरुंड येथील क्लिनिक बंद करून येत असताना वरेकरवाडी येथील प्राथमिक शाळेसमोर रस्त्यावर बिबट्या उभा होता.

गाडीची लाईट पडल्याने तो बाजूला झाला.  डॉ. वरेकर गाडी वेगात घेऊन जात असताना काही अंतरापर्यंत त्याने गाडीचा पाठलाग केला. या प्रकारामुळे सध्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नाटोशी येथे ग्रामपंचायतीची निवडणूक असल्यामुळे रात्री १२ वाजता काही ग्रामस्थ वरेकरवाडी येथील चौकात बसले असताना त्यांना बिबट्याचे दर्शन झाले. यावेळी ग्रामस्थांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या नजीकच्या उसाच्या शेतामध्ये पळाला. यामुळे कुसरुंड, नाटोशी, वाडीकोतावडे, आंब्रग या परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मजुरांचा तुटवडा त्यात बिबट्याची भीतीमोरणा विभागात भात, भुईमूग, सोयाबीन, ज्वारी काढणीची कामे सुरू आहेत. या कामाकरिता आधीच मजुरांची संख्या कमी असताना कुसरुंड, नाटोशी, आंब्रग, वाडीकोतावडे या परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. त्यामुळे मजूरही शेतात जाण्यास घाबरत आहेत. पिके चांगली येऊनही काढणीअभावी नुकसान होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरTigerवाघ