शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : वन्यजीवांची तहान भागविण्यासाठी कास पठारावर कुंड्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 13:26 IST

जागतिक वारसास्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कास पठारावर कार्यकारिणी समिती व वनविभाग यांच्याकडून वन्यजीवांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी येथील वीस कुंड्यांमध्ये वेळच्या वेळी पाणी सोडून सोय करण्यात आली आहे.

ठळक मुद्देवन्यजीवांची तहान भागविण्यासाठी कास पठारावर कुंड्या !वेळच्यावेळी पाणी सोडण्यात येते डोंगरमाथ्यावरील झरे आटू लागले

पेट्री : सध्या उन्हाची तीव्रता जाणवत असून पठार, डोंगर माथ्यावरील झऱ्यांतील पाणी कमी होत चालले आहे. त्यामुळे जागतिक वारसास्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कास पठारावर कार्यकारिणी समिती व वनविभाग यांच्याकडून वन्यजीवांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी सोय करण्यात आली आहे. येथील वीस कुंड्यांमध्ये वेळच्या वेळी पाणी सोडून वन्य पशुपक्ष्यांची तहान भागवली जात आहे.सातारा जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून ओळखला जाणारा कास पठार परिसर हिरवीगार दाट झाडी, झुडपांचा असून, या परिसरात मोठ्या प्रमाणावर प्राणीसंपदा आहे. यात बिबट्या, रानगवे, अस्वल, साळींदर, ससे, भेकर, माकड, रानडुक्कर, वानर तसेच अनेकविध पशुपक्ष्यांचा समावेश आहे.

सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाल्याने वातावरणातील उष्णता वाढत आहे. परिणामी पाण्याअभावी वन्य पशुपक्ष्यांची इतरत्र भ्रमंती न होता व त्यांच्या अधिवासात कोणताही बदल होऊ नये, यासाठी या वन्यजीवांसह पठारावर चरणाऱ्या जनावरांनाही यामुळे पिण्याच्या पाण्याची सोय होऊ लागली आहे.सध्या कास परिसरात दिवसभर ऊन जाणवू लागले आहे. तसेच परिसरातील झऱ्यांचे पाणीही कमी होत चालले असून, काही ठिकाणी झरे आटण्याच्या मार्गावर आहेत. पठारापासून राजमार्गाने तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या कुमुदिनी तलावाचे पाणीही कमी होताना दिसत आहे. यामुळे कार्यकारिणी समिती व वनविभागाकडून तीन वर्षांपूर्वीच ठिकठिकाणी सिमेंटच्या पाण्याच्या कुंड्या पुरण्यात आल्या आहेत.

वन्यजीवांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा, तसेच त्यांना मुबलक प्रमाणात पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी त्यामध्ये पाणी सोडले जात आहे. पाणी कमी होत जाईल तसे दर एक-दोन दिवसाला या कुंड्यांमध्ये पाणी भरले जात आहे. त्यामुळे वन्यजीवाची तहान भागत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणी