शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

सातारा बनतोय महाराष्ट्राचं ‘फ्रूट बास्केट’, जिल्ह्यात तब्बल २९ प्रकारची फळे 

By नितीन काळेल | Updated: June 15, 2023 12:24 IST

अनुकूल वातावरण, जमिनीची सुपिकता असे वैविध्यपूर्ण वातावरण

सातारा : वातावरण अनुकूल, जमिनीची सुपिकता वेगळी, दुसरीकडे विभागानुसार ३०० ते ५ हजार मिलीमीटरपर्यंत पडणारा पाऊस. अशा वैविध्यपूर्ण वातावरणामुळे जिल्ह्यात ७ हजार हेक्टरवर तब्बल २९ प्रकारची फळे घेण्यात येत आहेत. त्यामुळे सातारा जिल्हा महाराष्ट्राचं ‘फ्रूट बास्केट’ म्हणून पुढे येत आहे.सातारा जिल्ह्याचे प्रामुख्याने दोन भाग पडतात. पूर्वेकडील माण, खटाव, फलटण हे तालुके दुष्काळीपट्यात मोडतात. याठिकाणी ३०० ते ४०० मिलीमीटरपर्यंत पाऊस पडतो. तर पश्चिमेकडील सातारा, जावळी, पाटण, महाबळेश्वर या भागात पाऊस अधिक असतो. महाबळेश्वर, कोयनानगर येथे तर जून ते सप्टेंबर दरम्यान ५ हजार मिलीमीटरच्या वर पर्जन्यमान होते. जिल्ह्यात अशी भाैगोलिकता आहे. त्यामुळे विविध भागात वेगवेगळी पिके घेण्यात येतात. तसेच फळबागाही घेतल्या जातात. सध्या जिल्ह्यात २९ प्रकारची फळे घेण्यात येतात एेवढे वैविध्य जिल्ह्यात आहे.जिल्ह्यात सर्वाधिक फळबागांचे क्षेत्र डाळिंबाचे आहे. त्यानंतर इतर फळे घेण्यात येतात. यातील काही फळे कमी पाऊस पडणाऱ्या भागात होतात. तर काही फळांना पाऊस तसेच हवामान आवश्यक असते. अनुकूल हवामानानुसार फळबागा घेतल्या जातात. या फळबागांतून शेतकरी मालामाल होऊ लागले आहेत. यातूनच महाबळेश्वर तालुक्यात स्ट्राॅबेरी पर्यटन सुरू झाले. तर दुष्काळी भागात कृषी पर्यटनाला गती मिळाली आहे. परिणामी बळीराजासाठी हे आशादायकच वातावरण निर्माण झालेले आहे.

फळबागांचे होणारे फायदे...

  • फळपिकांत आंतरपीक घेता येते.
  • कमी पाण्यातही फळबागा घेणे शक्य होते.
  • शास्वत उत्पन्नाचा पर्याय निर्माण.
  • पर्यटनाच्या माध्यमातून अऱ्थार्जन होऊ शकते.
  • रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबण्यास मदत.
  • दुष्काळी तालुक्यात पर्यटन. एकाच ठिकाणी अनेक फळबागा.
  • पर्यटन व्यवसायातून फळांची विक्री.
  • फळांवर प्रक्रिया उद्योग झाल्यास रोजगार वाढणार.

जिल्ह्यातील २९ फळे आणि क्षेत्र...फळे - लागवाड (हेक्टरमध्ये)द्राक्ष               ६१८डाळिंब           १,६५८आंबा             १,४८६काजू             १४.७०सीताफळ      ६४८पेरू               ३९०कागदी लिंबू  ६८चिकू             २२७नारळ            १५१बोर               २६आवळा         ४२जांभूळ          २६फणस           २०चिंच              ८२अंजीर           १९संत्री              ०२मोसंबी         ०४सफरचंद      ०३केळी            २७५पपई              ५५ड्रॅगनफ्रूट      ४८स्ट्राॅबेरी     १,०३७कलिंगड     ८१टरबूज        १८रासबेरी       १०गुजबेरी       १०ब्लूबेरी        ०१मलबेरी       २२खूजर           - -

तालुकानिहाय बागांचे क्षेत्र हेक्टरमध्येसातारा              १६६काेरेगाव           २७३खटाव              १,१५३कऱ्हाड            ३०८पाटण              १७७वाई                 १६६जावळी           १९७खंडाळा          २००महाबळेश्वर    १५९फलटण          १,७८०माण               १,५५०

सातारा जिल्ह्यात फळबागांसाठी चांगले हवामान आहे. वेगवेगळ्या वातावरणात तब्बल २९ फळे घेतली जात आहेत. त्यामुळे सातारा जिल्हा हा महाराष्ट्राचं ‘फ्रूट बास्केट’ म्हणून पुढे येत आहे. यामधून शेतकऱ्यांना शास्वत उत्पन्नाचा मार्ग निर्माण झालेला आहे. तसेच कृषी विभागाच्या माध्यमातूनही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करुन योजनांचा लाभ दिला जातो. पुढील दोन वर्षांत जिल्ह्यात फळक्षेत्र आणि उत्पादनात वाढचा निर्धार करण्यात आलेला आहे. - भाग्यश्री फरांदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :Satara areaसातारा परिसरfruitsफळेFarmerशेतकरी