शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : सोयाबीन खरेदी केंद्रात व्यवहार सुरू, कोरेगाव बाजार समितीचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 13:34 IST

सध्याच्या बाजारपेठेतील सोयाबीनचा पडता दर लक्षात घेता शेतकऱ्यांचे नुकसान होते. हे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी त्यांना किमान किफायतशीर भाव मिळावा या हेतूने कोरेगांव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारात सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्याचा जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन खरेदी विक्री संघाच्या वतीने अध्यक्ष शहाजी भोईटे व उपाध्यक्ष प्रल्हादराव माने यांनी केले आहे.

ठळक मुद्देसोयाबीन खरेदी केंद्रात व्यवहार सुरू, कोरेगाव बाजार समितीचा पुढाकारआॅनलाईन नोंदणी करण्याचीही शेतकऱ्यांसाठी संधी उपलब्ध

पिंपोडे बुद्रूक (सातारा) : सध्याच्या बाजारपेठेतील सोयाबीनचा पडता दर लक्षात घेता शेतकऱ्यांचे नुकसान होते. हे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी त्यांना किमान किफायतशीर भाव मिळावा या हेतूने कोरेगांव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारात सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्याचा जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन खरेदी विक्री संघाच्या वतीने अध्यक्ष शहाजी भोईटे व उपाध्यक्ष प्रल्हादराव माने यांनी केले आहे.शेतकऱ्यांच्या मालाला केंद्र शासनाने निर्धारीत केलेली किमान आधारभूत किंमत मिळावी या हेतूने कोरेगांव तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ, शेती उत्पन्न बाजार समिती व मार्केटिंग फेडरेशन, सातारा यांच्या संयुक्त विद्यमानाने नाफेडच्या मंजुरीने खरीप हंगाम सन २०१८-१९ करीता बाजार समिती कोरेगांव येथील मुख्य बाजार आवारात सोयाबीन खरेदी केंद्र सुरू केले आहे.हे केंद्र १ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन कोरेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन शहाजीराव भोईटे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी वखार महामंडळ कोरेगाव साठा अधीक्षक जाधव, सहायक निबंधक सुद्रीक, खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक राजेंद्र येवले, कोरेगाव बाजार समितीचे सहायक सचिव संभाजीराव निकम, संचालक पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.बाजारात सोयाबीन मालाची ज्यादा आवक झाल्याने बाजार भाव किमान आधारभूत किंमतीपेक्षा कमी होण्याची शक्यता वर्तवली जात असताना अशा प्रकारे शेतकऱ्यांची गळचेपी होऊन आर्थिक नुकसान होऊ नये या हेतूने हे खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे.

या ठिकाणी केंद्र शासनाने ठरविलेल्या किमान अधारभूत किंमतीने म्हणजेच प्रति क्विंटल ३ हजार ३९९ रुपये दराने सोयाबीन खरेदी करण्यात येणार आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी खरेदी केंद्र्रावर आॅनलाईन नोंदणी करता २०१८-२०१९ चे सोयाबीन या पिक पाण्याच्या नोंदीसह ७/१२ उतारा, आधारकार्ड, बँक पासबुकची प्रत घेऊन येणे अनिवार्य केले आहे.दरम्यान शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर आणलेला माल स्वच्छ असावा मालाची आर्दता कमाल बारा टक्के असावी तो काडीकचरा किंवा मातीमिश्रिती नसावा असे आवाहन खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक राजेंद्र येवले यांनी केले आहे

टॅग्स :FarmerशेतकरीSatara areaसातारा परिसर