शहरं
Join us  
Trending Stories
1
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
4
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
5
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
6
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
7
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...
8
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
9
दसरा मेळाव्यानंतर नवा वाद! रामदास कदमांचा धक्कादायक दावा, संजय राऊतांचं संतप्त प्रत्युत्तर
10
माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय?
11
ITR चुकला? घाबरू नका, 'या' तारखेपर्यंत भरा बिलिटेड रिटर्न; पण, इतका दंड आणि व्याज भरावे लागणार
12
"भारतीय कंपन्या 'क्रोनीझम'ने नाही, तर..", राहुल गांधींचे कोलंबियातून भाजपवर टीकास्त्र
13
Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य
14
मारुतीचं साम्राज्य धोक्यात...? ह्यूंदाई-महिंद्राला पछाडत 'ही' कंपनी बनली देशातली No.2 ब्रँड! 'MS' पासून फक्त एक पाऊल दूर
15
हृदयद्रावक! कफ सिरप पिऊन झोपला अन् उठलाच नाही; मोफत औषधामुळे मुलाचा मृत्यू
16
Bigg Boss 19: आता खरी मजा येणार! भारतीय क्रिकेटरची बहीण 'बिग बॉस'च्या घरात येणार, कोण आहे ती?
17
पाशांकुश एकादशीला 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; काय घ्यावी काळजी? वाचा!
18
उद्धव ठाकरेंची सोडली साथ, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच राजन तेली म्हणाले, "दुर्दैवाने तिथे..."
19
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
20
एआयपासून बनलेली जगातील पहिली अभिनेत्री, ओळखून दाखवणं कठीण; कलाकारांकडून तीव्र निषेध!

सातारा : जबरी चोरी करणारी टोळी गजाआड, मुद्देमाल ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 13:46 IST

कोरेगाव रस्त्यावर एकावर चाकूने वार करून अडीच हजारांची जबरी चोरी करणाऱ्या हल्लेखोरांना सातारा गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली. गणेश शंकर माळवे (वय २०, रा. वर्धनगड, ता. कोरेगाव), सचिन विजय बुधावले (२१, रामोशीवाडी, ता. कोरेगाव), पवन मधुकर बुधावले (रा. रामोशीवाडी, ता. कोरेगाव) यांना अटक अटक करण्यात आली.

ठळक मुद्देजबरी चोरी करणारी टोळी गजाआडसातारा गुन्हे प्रकटीकरण शाखेने केली हल्लेखोरांना अटक

सातारा : कोरेगाव रस्त्यावर एकावर चाकूने वार करून अडीच हजारांची जबरी चोरी करणाऱ्या हल्लेखोरांना सातारा गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली. गणेश शंकर माळवे (वय २०, रा. वर्धनगड, ता. कोरेगाव), सचिन विजय बुधावले (२१, रामोशीवाडी, ता. कोरेगाव), पवन मधुकर बुधावले (रा. रामोशीवाडी, ता. कोरेगाव) यांना अटक अटक करण्यात आली.याबाबत माहिती अशी की, अक्षय तानाजी जाधव (२४, जळगाव, ता. कोरेगाव) हा दि. २३ रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास कोरेगाव रस्त्याने जात असताना सर्वोदय कॉलेजसमोर लघुशंकेसाठी थांबला असता, त्यावेळी एका दुचाकीवर आलेल्या दोघांनी अक्षयवर चाकूने हल्ला करून त्याच्या खिशातील एक हजार रुपये व मोबाईल अशा एकूण अडीच हजार रुपयांची चोरी केली.

याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक बी. जी. दवणे यांच्या पथकाने सापळा रचून वेगवेगळ्या ठिकाणांवरून गणेश माळवे, सचिन बुधावले, पवन बुधावले यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. त्याचबरोबर चोरीसाठी वापरलेली दुचाकी कुंभारवाडा, ता. कोरेगाव येथून चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली.

पोलिसांनी त्यांच्याकडून मुद्देमाल ताब्यात घेतला घेतला आहे. या आरोपींकडून आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक डी. जे. ढवळे, पोलीस नाईक शिवाजी भिसे, अनिल स्वामी, पंकज ढाणे, अविनाश चव्हाण, धीरज कुंभार सुनील भोसले, अमोल साळुंखे, मुनीर मुल्ला, नीलेश गायकवाड, मंगेश सोनवणे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर