शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
2
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी
3
Rahul Gandhi : राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल
4
"56 इंचाची छाती असून, अमेरिकेपुढे झुकतात", राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
5
युक्रेनकडून रशियावर भीषण ड्रोनहल्ला, तुआप्से बंदरात घडवला मोठा विध्वंस, ऑईल टर्मिलन जळाले  
6
PM किसानचा २१वा हप्ता कधी येणार? मोठी अपडेट समोर! 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाहीत २००० रुपये
7
‘सत्याचा मोर्चा’त शरद पवारांचे विधान; शिंदे गटाचे नेते म्हणाले, “५० वर्ष सत्ता भोगली...”
8
“अजित पवार, शेतकऱ्यांनी जीवन संपवावे असे वाटते का तुम्हाला?”; प्रकाश आंबेडकरांचा सवाल
9
मुंबईतील कॉन्सर्टवेळी 'मिस्ट्री मॅन'सोबत दिसली मलायका अरोरा, नेटकरी म्हणाले, "अर्जुनपेक्षा भारी..."
10
"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया
11
IND-W vs SA-W Final : टॉस आधी पावसाची बॅटिंग! मेगा फायनलमध्ये ५०-५० षटकांचा खेळ होणार का?
12
रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर; शेअर्स रॉकेट वेगाने धावणार?
13
तंत्रज्ञानाची किमया! चित्रपट पाहत असताना...; Apple वॉचमुळे वाचला २६ वर्षीय तरुणाचा जीव
14
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
15
आर्थिक व्यवहारावरून वाद, राष्ट्रवादीच्या नेत्याने रोखली शिंदे सेनेच्या नेत्यावर बंदूक
16
Crime: कुटुंबासाठी काळ ठरला नवरा; बायको मुलीसह नातेवाईकाचा विळ्याने चिरला गळा, कारण काय?
17
तुमच्या बचतीवर बक्कळ नफा! ही घ्या ३ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी
18
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
19
पत्नीला द्यायचं होतं सरप्राइज, पानवाल्याने जमवली १ लाखाची नाणी, सोनाराकडे गेला, त्यानंतर...   
20
Video - अडीच वर्षांचा मुलगा खेळताना आली स्कूल व्हॅन अन्...; काळजात चर्र करणारी घटना

सातारा :भक्तांची लूूटमार करणाऱ्या टोळीवर मोक्का, पाच पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 14:00 IST

औंध येथील यमाई देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना मारहाण करून लूटमार करणाºया टोळीवर जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी मोक्कांतर्गत कारवाई केली.

ठळक मुद्देभक्तांची लूूटमार करणाऱ्या टोळीवर मोक्कापाच पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल

सातारा : औंध येथील यमाई देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना मारहाण करून लूटमार करणाऱ्या टोळीवर जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी मोक्कांतर्गत कारवाई केली.बाळू गिरजाप्पा जाधव, विशाल अशोक मदने (दोघे रा. महिमानगड, ता. माण) यांच्यासह अन्य दोघाजणांना मोक्का लावण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मे महिन्यामध्ये एक दाम्पत्य यमाई देवीच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी संबंधित दाम्पत्य तेथील पायऱ्यावर बसले होते.

यावेळी टोळीप्रमुख बाळू जाधव याच्यासह त्याच्या टोळीने त्या दाम्पत्याकडे चौकशी करून स्वत:जवळ असलेला ऐवज काढून द्या, अशी मागणी केली. त्याला विरोध केल्याने चिडून त्यांनी दाम्पत्याला मारहाण केली.त्यांच्याजवळील पाच हजारांची रोकड आणि मोबाईल या टोळीने हिसकावून घेऊन पलायन केले होते. त्यांच्याविरुद्ध औंध पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. बाळू व विशाल या दोघांना पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस आले.

या टोळीने चोरी, घरफोडी, दरोडा, गर्दीत मारामारी, खुनाचा प्रयत्न यासारखे गंभीर गुन्हे केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यांच्याविरुद्ध वडूज, दहिवडी, सातारा तालुका, पुणे जिल्ह्यातील राजगड या पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत.औंध पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यामध्ये या टोळीचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर औंध पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षकांनी संघटित गुन्हेगारी अधिनियमान्वये पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्यामार्फत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे प्रस्ताव पाठविला होता. या प्रस्तावाला नांगरे-पाटील यांनी मंजुरी दिली आहे. या प्रकरणाचा तपास दहिवडीचे उपविभागीय अधिकारी यशवंत काळे हे करत आहेत.आत्तापर्यंत नऊ टोळ्यांवर कारवाईएका वर्षात तब्बल नऊ टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये साताऱ्यातील प्रमोद ऊर्फ खंड्या धाराशिवकर, महेंद्र तपासे, अमित ऊर्फ सोन्या देशमुख, आकाश खुडे, शेखर गोरे, आशिष जाधव, अनिल कस्तुरे, चंद्रकांत ऊर्फ चंदर लक्ष्मण लोखंडे, अमित ऊर्फ बिऱ्या रमेश कदम यांच्यासह अशा एकूण ९ टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अशा टोळ्यांच्या हालचालीवर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट आणि सहायक पोलीस निरीक्षक सुनील जाधव हे बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हाSatara areaसातारा परिसर