शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : फडतरवाडीत सव्वा एकर ऊस खाक, शॉर्टसर्किटमुळे आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 17:11 IST

फडतरवाडी (नेर) ता. खटाव येथील श्रीमंत मारुती फडतरे यांच्या गट नं. ४५८ मधील शेतात असलेल्या उसाच्या फडाला शॉर्टसर्किटमुळे आग लागून सव्वा एकर क्षेत्रावरील ऊस खाक झाला. या आगीत संबंधित शेतकऱ्यांचे सुमारे एक लाख रुपयाचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देफडतरवाडीत सव्वा एकर ऊस खाक, शॉर्टसर्किटमुळे आग खांबावरून ठिणग्या अन् वाऱ्यांसोबत आग भडकली

पुसेगाव : फडतरवाडी (नेर) ता. खटाव येथील श्रीमंत मारुती फडतरे यांच्या गट नं. ४५८ मधील शेतात असलेल्या उसाच्या फडाला शॉर्टसर्किटमुळे आग लागून सव्वा एकर क्षेत्रावरील ऊस खाक झाला. या आगीत संबंधित शेतकऱ्यांचे सुमारे एक लाख रुपयाचे नुकसान झाले आहे.नेर फडतरवाडी येथील दरा नावाच्या शिवारात बुधवारी सकाळी सव्वादहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मारुती बाळू फडतरे यांच्या पडीक क्षेत्रात असलेल्या विजेच्या पोलवर शॉर्टसर्किट होऊन आगीच्या ठिणग्या पोलखाली वाळलेल्या गवतावर पडल्याने गवताने पेट घेतला. वाऱ्यांच्या वेगामुळे आगीने क्षणार्धात रौद्र्ररूप धारण केले. वाऱ्यांच्या साथीने आग भडकत गेली व शेजारी असलेल्या श्रीमंत फडतरे यांच्या उसाला आगीने चोहोबाजूने वेढा टाकला.हिम्मत फडतरे या शेतकऱ्यांने आरडाओरडा करून शिवारातील लोकांना मदतीसाठी बोलावले. परंतु वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे आग विझविण्यासाठी पाणी उपलब्ध होऊ शकले नाही. त्यामुळे मुकेश फडतरे, दिलीप फडतरे, राजू फडतरे, कृष्णा फडतरे, विलास फडतरे, वामन फडतरे, राजेंद्र फडतरे, मोहन कचरे आदी शेतकऱ्यांनी झाडाच्या ओल्या फांद्याच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न केला; परंतु वाऱ्यांच्या प्रचंड वेगामुळे आग भडकत जाऊन तासाभरात संपूर्ण शेत आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या घटनेची माहिती मिळताच गाव कामगार तलाठी आमोल जाधव यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन झालेल्या नुकसानीचा पंचनामा केला.

दरम्यान, एकाच आठवड्यात शॉर्टसर्कि टमुळे आग लागून ऊस जळण्याची ही शिवारातील पाचवी घटना आहे. शॉर्टसर्कि टमुळे या आठवड्यात गोविंद पंढरीनाथ फडतरे यांचा ऊस व उसातील ड्रीपचे साहित्य जळून ९० हजारांचे नुकसान झाले आहे. जनार्दन मोहिते यांचे ७० हजार रुपयांचे, तानाजी बाजीराव मोहिते यांचे ८० हजार रुपयांचे तर अरविंद पंढरीनाथ फडतरे यांचे दीडलाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरfireआग