शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना झोपेतून उठवून आणेपर्यंत फॅक्टरी खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 19:17 IST

शेंगदाणा फॅक्टरीला शनिवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास अचानक आग लागल्यानंतर मालकाने १०१ या नंबरवर अग्निशामक दलाला बऱ्याचवेळा फोन लावला. मात्र, तिकडून कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने फॅक्टरी मालकाची घालमेल वाढली. अखेर दुचाकीवरून मालकाने अग्निशामक दलाचे कार्यालय गाठले. गाढ झोपेत असलेल्या कर्मचाऱ्यांना उठवून आणेपर्यंत मात्र, फॅक्टरी जळून खाक झाली.

ठळक मुद्देसाताऱ्यांत मध्यरात्री थरार रोकडसह साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना झोपेतून उठवून आणेपर्यंत फॅक्टरी खाक

सातारा : शेंगदाणा फॅक्टरीला शनिवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास अचानक आग लागल्यानंतर मालकाने १०१ या नंबरवर अग्निशामक दलाला बऱ्याचवेळा फोन लावला. मात्र, तिकडून कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने फॅक्टरी मालकाची घालमेल वाढली. अखेर दुचाकीवरून मालकाने अग्निशामक दलाचे कार्यालय गाठले. गाढ झोपेत असलेल्या कर्मचाऱ्यांना उठवून आणेपर्यंत मात्र, फॅक्टरी जळून खाक झाली.साताऱ्यातील भरवस्तीत घडलेल्या या घटनेने प्रचंड खळबळ उडाली. पोलिस मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर सतीश रावखंडे यांची शेंगदाणा फॅक्टरी आहे. या फॅक्टरीमध्ये विविध प्रकारचे शेंगदाणे तयार करून विकले जातात. शनिवारी मध्यरात्री या फॅक्टरीला अचानक आग लागली.

मालक सतीश रावखंडे यांच्या हा प्रकार निदर्शनास आला. त्यांनी तत्काळ १०१ या नंबरवर अग्निशामक दलाला फोन केला. मात्र, त्यांना कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी पोलिसांनाही फोन केला. इथेही त्यांची निराशा झाली. फॅक्टरीमध्ये आग भडकत चालली होती. त्यामुळे ते चिंतेत पडले. काही करावे त्यांना सुचेनासे झाले. अखेर त्यांनी दुचाकीवरून थेट राजवाडा येथील अग्निशामक दलाचे कार्यालय गाठले.

बाहेरून त्यांनी बऱ्याचवेळ दरवाजा ठोठावला. मात्र, आतून त्यांना काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी दरवाजावरील भिंतीवरून आत प्रवेश करून अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना झोपेतून उठवले. या सर्व धांदलीत सुमारे १५ मिनिटे त्यांचा तेथेच वेळ वाया गेला.

कर्मचारी झोपेतून उठल्यानंतर अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी पोहोचला. मात्र, तोपर्यंत फॅक्टरीमधील शेंगदाणा भाजण्याची भट्टी, फर्निचर, कच्चा माल, काही रोकड असा सुमारे एक लाखाचा ऐवज जळून खाक झाला होता. परंतु उर्वरित ठिकणी लागलेली आग अग्निशामक दलाने आटोक्यात आणली.अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली असती तर फॅक्टरीमधील काही भाग आगीपासून सुरक्षित राहिला असता, असा आरोप फॅक्टरीचे मालक सतीश रावखंडे यांनी केला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरfireआग