साताऱ्यात ड्रायव्हरला मारहाण करून लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:40 IST2021-02-11T04:40:51+5:302021-02-11T04:40:51+5:30
सातारा : येथील बसस्थानकाशेजारी असणाऱ्या पे ॲण्ड पार्किंगमध्ये पार्क केलेली गाडी काढण्यासाठी ड्रायव्हर जात असताना त्याला उसाने मारहाण केली. ...

साताऱ्यात ड्रायव्हरला मारहाण करून लुटले
सातारा : येथील बसस्थानकाशेजारी असणाऱ्या पे ॲण्ड पार्किंगमध्ये पार्क केलेली गाडी काढण्यासाठी ड्रायव्हर जात असताना त्याला उसाने मारहाण केली. तसेच त्याच्याकडील अर्ध्या तोळ्याची अंगठी जबरदस्तीने काढून नेण्याचा प्रकार रविवार, दि. ७ रोजी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडला. याप्रकरणी चार अज्ञातांवर गुन्हा दाखल झाला.
याबाबत अधिक माहिती अशी, किशोर बाळासोा कांबळे (वय ३४, रा. आझाद बेकरीमागे, मोळाचा ओढा, सातारा) हे ड्रायव्हर असून त्यांनी आपली गाडी बसस्थानक परिसरात असणाऱ्या श्री गणेश पे ॲण्ड पार्किंगमध्ये पार्क केली होती. मध्यरात्री ते आपली गाडी येथे काढण्यासाठी रस्ता क्रॉस करून जात असतानाच चौघेजण तेथे वेगाने आले आणि किशोर यांच्याजवळ येऊन थांबले. यावेळी त्यांच्यात वादावादी झाली. यानंतर चारही अनोळखी गाडीतून खाली उतरले आणि त्यांनी किशोर यांना उसाने मारहाण करून हातातील २५ हजार रुपये किमतीची अर्धा तोळे सोन्याची अंगठी जबरदस्तीने काढून नेली. या घटनेची माहिती किशोर यांनी मंगळवार, दि. ९ रोजी रात्री पावणेआठ वाजण्याच्या सुमारास शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिल्यानंतर चौघा अज्ञातांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास सहायक फौजदार कारळे करत आहेत.