शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : खंडणी न दिल्याने एकावर तलवार हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 12:02 IST

देगाव फाटा येथील एका पानटपरी चालकाने खंडणी देण्यास नकार दिल्याने त्यावर तलवार हल्ला केल्याची घटना गुरुवारी रात्री उशिरा घडली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देखंडणी न दिल्याने एकावर तलवार हल्लापोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल

सातारा : देगाव फाटा येथील एका पानटपरी चालकाने खंडणी देण्यास नकार दिल्याने त्यावर तलवार हल्ला केल्याची घटना गुरुवारी रात्री उशिरा घडली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेजस भारत भांडवलकर (वय २२, रा. कृष्णानगर, सातारा) असे जखमी तरुणाचे नाव आहे.याबाबत माहिती अशी की, तेजस भांडवलकर याचा देगाव फाटा येथे पानटपरीचा व्यवसाय आहे. गुरुवारी रात्री अकरा वाजता तो पानटपरी बंद करून घरी निघाला होता. दरम्यान, त्याठिकाणी श्रीकांत जाधव ऊर्फ पप्पू पॅरागॉन, संदीप जाधव ऊर्फ पप्पू टीस, गणेश भोसले, अभिजित आबा जाधव व इतर दोन ते तीनजण आले.

श्रीकांतने 'मला हप्ता देऊन धंदा करायचा, नाहीतर धंदा बंद करायचा,' अशी धमकी दिली. त्यावेळी तेजसने 'हप्ता देणे परवडत नाही,' म्हटल्याच्या कारणावरून चिडून जाऊन चौघांनी शिवीगाळ करून हातावर तलवाराने वार केला. त्याचबरोबर लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.

या मारहाणीत तेजस गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एन. एस. कदम करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrimeगुन्हा