शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

न्यायाधीशांना सीसीटीव्ही फुटेज द्या - उच्च न्यायालय; लाचप्रकरणी सातारा जिल्हा सत्र न्यायाधीशांना तूर्तास दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 12:58 IST

लाचखोरीच्या आरोपामुळे अडचणीत सापडलेल्या जिल्हा सत्र न्यायाधीशांना उच्च न्यायालयाचा तूर्तास दिलासा

सातारा : लाचखोरीच्या आरोपामुळे अडचणीत सापडलेल्या जिल्हा सत्र न्यायाधीशांना उच्च न्यायालयाने तूर्तास दिलासा दिला. न्यायमूर्ती एन. आर. बोरकर यांच्या एकलपीठाने सातारा जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांना बँकेच्या मुथा कॉलनी शाखेच्या आवारातील ९ डिसेंबर २०२४ रोजीचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून द्या, असे आदेश न्यायालयाने एचडीएफसी बँकेला दिले.सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यातर्फे ॲड. विरेश पुरवंत यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या अर्जावर न्या. एन. आर. बोरकर यांच्या एकलपीठापुढे सुनावणी झाली. आपणास लाचखोरीच्या गुन्ह्यात नाहक गोवले आहे. लाच मागितल्याचा किंवा स्वीकारल्याचा कोणताही पुरावा नाही, असा युक्तिवाद निकम यांच्यावतीने ॲड. अशोक मुंदरगी यांनी केला.

न्यायाधीश निकम आणि तक्रारदार यांच्या लाचेच्या रकमेबाबत एचडीएफसी बँकेच्या आवारात बोलणी झाल्याचे सरकारी पक्षाने म्हटले आहे. त्यानुसार निकम यांनी बँकेकडे सीसीटीव्ही फुटेज मागितले होते. मात्र खासगी बाब असल्याच्या कारणावरून फुटेज देण्यास बँकेने नकार दिला. याकडे ॲड. मुंदरगी यांनी लक्ष वेधले आणि फुटेज देण्यासाठी बँकेला आदेश देण्याची विनंती केली. ही विनंती मान्य करीत न्यायमूर्ती बोरकर यांनी बँकेला सातारा जिल्ह्यातील मुथा कॉलनी शाखेच्या आवारातील सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून देण्याचे आदेश देत याचिकेची सुनावणी २७ जानेवारीला निश्चित केली.लाचलुचपत विभागाच्या म्हणण्यानुसार, मुंबईतील किशोर खरात व सातारा येथील आनंद खरात या दोन संशयितांनी निकम यांच्या सांगण्यावरून जामीन मंजुरीचा आदेश देण्यासाठी एका महिलेकडून ५ लाख रुपयांची मागणी केली. ३ ते ९ डिसेंबर २०२४ यादरम्यान केलेल्या चौकशीत लाच मागण्यात आल्याचे उघड झाल्याचे एसीबीने म्हटले आहे. याप्रकरणी एसीबीने निकम यांच्यासह किशोर खरात, आनंद खरात व अन्य एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCourtन्यायालयBribe Caseलाच प्रकरणHigh Courtउच्च न्यायालय