शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

सातारा जिल्ह्यात १२ हजार मिलीमीटर पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 14:00 IST

सातारा : जिल्ह्यात एक जूनपासून आजपर्यंत तब्बल १२ हजार ३९३ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. यापैकी सर्वाधिक पाऊस महाबळेश्वर तर सर्वात कमी माण तालुक्यात झाला आहे.जून महिना कोरडा गेल्यानंतर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. पूर्वेकडील माण, खटाव, फलटण व कोरेगाव ही तालुके वगळता पश्चिम भागात दमदार पाऊस झाला. यामुळे पश्चिम ...

ठळक मुद्देमहाबळेश्वरात सर्वाधिक नोंद माण तालुक्याकडे यंदाही पाठ

सातारा : जिल्ह्यात एक जूनपासून आजपर्यंत तब्बल १२ हजार ३९३ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. यापैकी सर्वाधिक पाऊस महाबळेश्वर तर सर्वात कमी माण तालुक्यात झाला आहे.

जून महिना कोरडा गेल्यानंतर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. पूर्वेकडील माण, खटाव, फलटण व कोरेगाव ही तालुके वगळता पश्चिम भागात दमदार पाऊस झाला. यामुळे पश्चिम भागातील धरणे, तलाव, बंधारे पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले. मात्र, पूर्वेकडे पावसाने पाठ फिरविल्याने बळीराजा संकटात सापडला होता.

अनेक शेतकºयांवर पाण्याअभावी दुबार पेरणीचे संकट ओढावले. पाऊस पडेल ही आशा धूसर झाली असताना गेल्या पंधरा दिवसांपासून माण, खटाव व फलटण तालुक्याला परतीच्या पावसाने अक्षरश: झोडपून काढले.

मुुसळधार पावसाने या तिन्ही तालुक्यांमध्ये मुबलक पाणीसाठा झाला असून, पाणीटंचाईचे संकटही आता मिटले आहे. त्यामुळे शेतकºयांमधून समाधान व्यक्त होत आहे. जिल्ह्यात १ जूनपासून आजपर्यंत १२ हजार ३९३ मिलीमीटर पाऊस झाला असून, गेल्या वर्षी १० आॅक्टोबर रोजी १३ हजार ५८६ मिलीमीटर पाऊस झाला होता.

यंदा सर्वाधिक ४ हजार ८५३ मिलीमीटर पाऊस महाबळेश्वर तालुक्यात झाला असून, सर्वात कमी ३९३ मिलीमीटर पाऊस माण तालुक्यात झाला आहे. पावसाची तालुकानिहाय सरासरी १ हजार १२२ मिलीमीटर इतकी आहे.तालुकानिहाय एकूण पाऊस (मिलीमीटरमध्ये)सातारा ९१३.२, जावळी १५५३.९, पाटण १२४८.४, कºहाड ६८१.१, कोरेगाव ४०१.८, खटाव ५७७.१, माण ३९३.२, फलटण ४७३.२, खंडाळा ५१७, वाई ७३६, महाबळेश्वर ४८५३.७.