सातारा जिल्ह्याला मिळणार नवीन ३८ रुग्णवाहिका : पालकमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:40 IST2021-04-16T04:40:27+5:302021-04-16T04:40:27+5:30

सातारा : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता, रुग्णांना तत्काळ उपचार मिळावेत, यासाठी जिल्हा परिषदेला ३८ रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी ...

Satara district to get 38 new ambulances: Guardian Minister | सातारा जिल्ह्याला मिळणार नवीन ३८ रुग्णवाहिका : पालकमंत्री

सातारा जिल्ह्याला मिळणार नवीन ३८ रुग्णवाहिका : पालकमंत्री

सातारा : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता, रुग्णांना तत्काळ उपचार मिळावेत, यासाठी जिल्हा परिषदेला ३८ रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी ५ कोटी ४५ लाख ८७ हजार २५६ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील आरोग्य सेवा बळकटीकरणासाठी शासनाने हा अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला असल्याची माहिती पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.

१४ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या व्याजाच्या रकमेतून ३८ रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी ५ कोटी ४५ लाख ८७ हजार २५६ रुपये मंजूर करण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी हे अतिशय महत्त्वाचे पाऊल आहे. या ३८ सुसज्ज अशा रुग्णवाहिकांच्या माध्यमातून कोरोनाबाधित रुग्णांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यास मदत होणार आहे. हा निधी मंजूर केल्याबद्दल पालकमंत्री पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे विशेष आभार मानले आहेत.

डोंगरी भागासाठी ७ व सर्वसाधारण भागासाठी ३१ अशा एकूण ३८ रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्याला रुग्णवाहिका मिळाव्यात, यासाठी माझ्यासह वित्त व नियोजन राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनीही प्रयत्न केले असल्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Satara district to get 38 new ambulances: Guardian Minister