शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सातारा :  दुचाकीच्या धडकेत पादचारी वृद्धा ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 14:43 IST

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर येथील शेंद्रेजवळ रस्ता ओलांडत असताना दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत पादचारी महिला जागीच ठार झाली. हा अपघात सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास झाला.

ठळक मुद्दे दुचाकीच्या धडकेत पादचारी वृद्धा ठारपोलीस घेत आहेत, त्या दुचाकीस्वाराचा शोध

सातारा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर येथील शेंद्रेजवळ रस्ता ओलांडत असताना दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत पादचारी महिला जागीच ठार झाली. हा अपघात सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास झाला.सावित्राबाई अप्पा शेंडगे (वय ६०, रा. रेडे, ता. माळशिरस, जि. सोलापूर) असे अपघातात ठार झालेल्या वृद्धेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून शेंडगे या आपल्या कुटुंबासह शेंद्रे परिसरात वास्तव्यास होत्या.सोमवारी सकाळी त्या शेंद्रे फाट्यावरील महामार्गावरून काही कामानिमित्त निघाल्या होत्या. याचवेळी नागठाणे बाजूकडून आलेल्या दुचाकीस्वार युवकाने त्यांना जोरदार धडक दिली.

ही धडक इतकी भीषण होती की शेंडगे या पाच ते सहा फूट फरफटत गेल्या. त्यामुळे त्यांच्या हाता-पायाला आणि डोक्याला गंभीर जखम झाली. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.या अपघातानंतर शेंडगे यांना खासगी वाहनाने सचिन रामचंद्र बोंबसे (रा. रामनगर, सातारा) यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान, ज्या दुचाकीस्वार युवकाने शेंडगे यांना धडक दिली. त्या दुचाकीस्वाराचा सातारा तालुका पोलीस शोध घेत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसर