शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पविरोधात अमेरिकन पेटून उठले, ‘नो किंग्ज’ म्हणत रस्त्यावर उतरले! सरकारी हुकुमशाहीचा विरोध
2
महाराष्ट्राला केंद्राकडून १,५६६ कोटी मदत; अमित शाह यांची घोषणा, CM फडणवीसांनी मानले आभार
3
परकीयांनी आधी विध्वंस करून लुटले, तर नंतर आलेल्यांनी बुद्धीला लुटले: सरसंघचालक मोहन भागवत
4
राज्यात ९६ लाख खोटे मतदार; राज ठाकरेंचा आरोप, निवडणुका शांततेत हव्या तर मतदार याद्या स्वच्छ करा
5
नितीशकुमारच एनडीएचे सर्वसहमतीचे नेते असतील; अमित शाह यांच्या वक्तव्यानंतर जदयूचा दावा
6
काय सांगता! १८६ कार खरेदी, तब्बल २१ कोटींचा डिस्काऊंट दिला; ऑडी, BMW, मर्सिडिज घेतल्या
7
झामुमोने दिला ‘एकला चलो’चा नारा; महाआघाडी आता फुटीच्या उंबरठ्यावर, जागावाटपावरून मतभेद
8
बिहार निवडणूक २०२५: निवडणूक आयोगाची ‘आर्थिक गुप्तचर समिती’ ६ वर्षांनी पुन्हा सक्रिय
9
आरोपीच्या वकिलाने ५०० पानी अर्ज केला, न्यायालयाने जामीन फेटाळला; नेमके प्रकरण काय?
10
चांदी स्थिरावणार, सोने भाव खाणार; चांदीचा प्रीमियम उतरला २५ हजारांवरून शून्यावर
11
पॅरिसच्या लूव्र म्युझियममध्ये ४ मिनिटांत नेपोलियन तिसरा याच्या ९ मौल्यवान वस्तू लांबवल्या
12
पाकिस्तान-अफगाण शस्त्रसंधीसाठी राजी; संघर्ष थांबणार, दोहा येथे वाटाघाटी
13
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
14
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
15
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
16
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
18
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
19
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?

सातारा : ट्रान्सफॉर्मरमध्ये फ्यूज लावताना शेतकऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 14:05 IST

शेतीला पाणी देण्याकरिता वीज मिळावी म्हणून ट्रान्सफॉर्मरमध्ये फ्यूज घालायला गेलेल्या शेतकरी युवकाचा शॉक लागून मृत्यू झाला. वडगाव हवेली, ता. कऱ्हाड येथे सोमवारी सकाळी ही घटना घडली. दिगंबर सुरेश जगताप (वय २६) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

ठळक मुद्दे ट्रान्सफॉर्मरमध्ये फ्यूज लावताना शेतकऱ्याचा मृत्यूवडगाव हवेलीत दुर्घटना : वीज कंपनीच्या कारभाराविरोधात संताप

वडगाव हवेली : शेतीला पाणी देण्याकरिता वीज मिळावी म्हणून ट्रान्सफॉर्मरमध्ये फ्यूज घालायला गेलेल्या शेतकरी युवकाचा शॉक लागून मृत्यू झाला. वडगाव हवेली, ता. कऱ्हाड येथे सोमवारी सकाळी ही घटना घडली. दिगंबर सुरेश जगताप (वय २६) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव हवेलीतील मोजीम नावच्या शिवारात अनेक शेतकऱ्यांची शेती आहे. सोमवारी सकाळी दिगंबर जगताप याच्यासह अन्य काही शेतकरी कामानिमित्त शिवारात गेले होते. दिगंबरसह अन्य एका शेतकऱ्याला त्यांच्या ऊस शेतीला पाणी लावायचे होते. तर अन्य एका शेतकऱ्याला औषध फवारणी करायची होती.

त्यासाठी ते बोअरिंगचा वीज पंप सुरू करायला गेले. मात्र, वीज पुरवठा खंडित झाला होता. शिवारातच असणाऱ्या ट्रान्सफॉर्मरच्या फ्यूजबॉक्समधील फ्यूज गेल्याचे निदर्शनास आल्यामुळे दिगंबरने वायरमनला फोन केला. अन्य शेतकऱ्यांनीही वारंवार वायरमनशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, वायरमनशी संपर्क झाला नाही. त्यामुळे दिगंबरसह अन्य दोघेजण फ्यूजबॉक्सकडे गेले.

वीज पुरवठा सुरू होण्यासाठी दिगंबरने स्वत:च फ्यूज घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, शॉक लागल्याने तो कोसळला. शेतकऱ्यांनी त्याला उपचारार्थ तातडीने रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात तपासणी करून त्याला मृत घोषित करण्यात आले.फ्यूजबॉक्समध्ये फक्त तारादिगंबरने ज्या ट्रान्सफॉर्मरच्या फ्यूजबॉक्समध्ये फ्यूज घालण्याचा प्रयत्न केला त्याठिकाणी फ्यूजऐवजी फक्त तारा वापरण्यात आल्या आहेत. पकडीने तार बसविण्याच्या प्रयत्नात दिगंबरला शॉक लागून त्याचा मृत्यू झाला. वीज कंपनीच्या या कारभाराविरोधात ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसर