शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : कालेच्या मुधाई डेअरीत दुर्घटना, स्टरलायझर मशीन आॅपरेटर्सचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 16:18 IST

दूध डेअरीत स्टरलायझर मशीन व्यवस्थित बंद न झाल्याने मशीनचा दरवाजा अचानक उघडून आॅपरेटरचा मृत्यू झाला. काले- पाचवड फाटा, ता. कऱ्हाड येथील मुधाई दूध डेअरीत सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

ठळक मुद्देकालेच्या मुधाई डेअरीत दुर्घटनास्टरलायझर मशीन आॅपरेटर्सचा मृत्यू

कऱ्हाड : दूध डेअरीत स्टरलायझर मशीन व्यवस्थित बंद न झाल्याने मशीनचा दरवाजा अचानक उघडून आॅपरेटरचा मृत्यू झाला. काले- पाचवड फाटा, ता. कऱ्हाड येथील मुधाई दूध डेअरीत सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. उमेशकुमार हिंगुराव यादव (वय २८ मूळ रा. भदोली, रविधारानगर, उत्तरप्रदेश. सध्या रा. कालेटेक, ता. कऱ्हाड ) असे मृत आॅपरेटरचे नाव आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कालेगावच्या हद्दीत पाचवडफाटा येथे मुधाई दूध डेअरी आहे. या डेअरीत परिसरातील गावातील संकलित केलेले दूध आणले जाते. तसेच दुधाचे वेगवेगळे फ्लेवर तयार करून ते दूध सातारासह इतर जिल्ह्यांत वितरित केले जाते. सोमवारी सकाळीही डेअरीत दूध संकलन करण्यात आले. त्यानंतर महिला कामगारांनी काचेच्या बाटल्यांमध्ये वेगवेगळे फ्लेवर टाकून सुगंधी दूध तयार केले.

दुधाने भरलेल्या या बाटल्या विशिष्ट तापमानास गरम करण्यासाठी स्टरलायझर मशीनमध्ये ठेवण्यात येतात. त्याप्रमाणे मशीन आॅपरेटर उमेश कुमार यादव याने दुधाने भरलेल्या बाटल्यांचे ट्रे मशीनमध्ये ठेवले. दूध गरम होण्यासाठी त्याने मशीनचा दरवाजा बंद केला. मात्र, दरवाजा व्यवस्थित बंद झाला नसावा.

परिणामी काही वेळातच दाब वाढून अचानक मशीनचा दरवाजा मोठ्या दबावाने उघडला गेला. या लोखंडी दरवाजाचा दणका उमेशकुमारला बसल्यामुळे तो जागीच ठार झाला.

घटनेची माहिती मिळताच कऱ्हाड तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी त्या ठिकाणी दाखल झाले. पंचनाम्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून देण्यात आला.

टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसरMilk Supplyदूध पुरवठा