शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकानी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळल्या
2
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
3
“अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार
4
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, शेख हसीना यांच्यावरील निकाल लवकरच येणार
5
मोठा खुलासा...! 8 दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
6
"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला
7
59 लाख पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत? कर्मचारी संघटनेने केंद्राला पत्र
8
सोन्यानंतर आता चांदीवरही लोन घेता येणार, RBI चा मोठा निर्णय; कसं जाणून घ्या
9
पश्चिम बंगालमध्ये 34 लाख Aadhar धारक ‘मृत’, UIDAI ची निवडणूक आयोगाला माहिती
10
'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
11
'आयुष्मान कार्ड' आणि 'आभा कार्ड'मध्ये तुमचाही होतो गोंधळ? यातील फरक आणि फायदे माहितीये का?
12
हृदयद्रावक! वाढदिवसाला प्रेमाने लेकाला बुलेट दिली, पण नंतर वडिलांवरच खांदा देण्याची वेळ आली
13
“मला काही बोला, पण माझ्या मुलीचा काय दोष?”; ट्रोलिंगमुळे इंदुरीकर महाराज आता कीर्तन सोडणार?
14
IND vs SA: मोहम्मद शमी Team India मध्ये का नाही? कर्णधार गिलने २ जणांची नावं घेत दिलं उत्तर
15
तुम्हीही 'डिजिटल गोल्ड' खरेदी करता का? आता सेबीचा इशारा, गुंतवणूकदारांनी काय करावं?
16
IND vs SA: " ईडन गार्डन्स माझ्यासाठी दुसरे घर!" कोलकाता कसोटीपूर्वी शुभमन गिल झाला भावूक!
17
बिल्डिंग नंबर १७, खोली क्रमांक १३; अल फलाह विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्येच बनवला 'टेरर अड्डा'
18
"दिग्गज अभिनेत्याचा तमाशा बनवला आहे...", करण जोहर भडकला; म्हणाला, 'हा अपमान...'
19
Video: कपलच्या रोमॅन्टिक फोटोशूटमध्ये 2 सेकंदासाठी आला 'तो' व्यक्ती; व्हिडिओ प्रचंड व्हायरल...
20
i20, इकोस्पोर्ट्स आणि आता Brezza कार सापडली: दिल्ली हादरवण्याचं संपूर्ण प्लॅनिंग आखलं होतं

सातारा : वीज कंपनीच्या आडमुठ्या धोरणामुळे वाड्या-वस्त्या अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 12:42 IST

घरगुती विद्युत पुरवठा चोवीस तास व्हावा, या हेतूने शासनाने सिंगल फ्यूजची वेगळी यंत्रणा राबविली. त्यामुळे फक्त उद्योगधंदा, शेतींना लागणाऱ्या वीज पुरवठ्याला भारनियमन लागले. सिंगल फ्यूजची यंत्रणा राबविताना काही भाग जोडला गेला नव्हता, जी घरे शेतामध्ये वाड्या-वस्त्यावर होती त्यांच्यासाठी थ्री फ्यूजऐवजी टू फ्ूयजची वीजपुरवठा कायम ठेवल्याने शेतीची वीज बंद राहून घरगुती उपलब्ध होत होती.

ठळक मुद्देवीज कंपनीच्या आडमुठ्या धोरणामुळे वाड्या-वस्त्या अंधारातमाण तालुक्यात भारनियमनाचा फटका : घरगुती वीज नियमित ठेवण्याची मागणी

दहिवडी : घरगुती विद्युत पुरवठा चोवीस तास व्हावा, या हेतूने शासनाने सिंगल फ्यूजची वेगळी यंत्रणा राबविली. त्यामुळे फक्त उद्योगधंदा, शेतींना लागणाऱ्या वीज पुरवठ्याला भारनियमन लागले. सिंगल फ्यूजची यंत्रणा राबविताना काही भाग जोडला गेला नव्हता, जी घरे शेतामध्ये वाड्या-वस्त्यावर होती त्यांच्यासाठी थ्री फ्यूजऐवजी टू फ्ूयजची वीजपुरवठा कायम ठेवल्याने शेतीची वीज बंद राहून घरगुती उपलब्ध होत होती.मात्र, गेल्या दोन दिवसांत सिंगल फ्यूजची वीज तशीच ठेवून सरसकट भारनियमन केल्याने थ्री फ्यूजच्या कनेक्शनवर घरगुती वीज रात्री सहा ते बारा बंद होत असून, वस्त्यांवरील राहणाऱ्या लोकांना अंधारात रात्र काढावी लागते. माण तालुक्यात सिंगल फ्यूज वगळून थ्री फ्यूजवरील २५ टक्के कनेक्शन अंधारात आहे.शासनाने भारनियमन करताना पूर्वीसारखी पूर्ण वीजपुरवठा बंद न करता सिंगल फ्यूजचा पुरवठा थ्री फ्यूजमधून पूर्वीसारखा कायम ठेवावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. अन्यथा तो भाग सिंगल फ्यूज कनेक्शनला जोडावा, अशी मागणी होत आहे.

गेली दोन दिवस अचानक झालेल्या भारनियमनामुळे जनतेत संतापाची लाट उसळली आहे. वारंवार दहिवडी वीजवीतरण मंडळाशी संपर्क साधला असता फोन बाजूला ठेवला जात असून, कोणतीही तक्रार ऐकून घेतली जात नसल्याचे निर्दशनास आले.

पूर्वी भारनियमन होत असताना त्यातून सिंगल फ्यूज लाईट सुरू होती. त्यामुळे रानातील एकट्या घरातही लाईट असायची; पण आत्ताचे भारनियमन पूर्ण बंद होत असल्याने थ्री फ्यूज कनेक्शनवरील घरे अंधारात राहणार असून, शासनाने पूर्वीसारखा निर्णय घ्यावा व घरगुती वीज नियमित ठेवावी, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल.- संजय भोसले, जिल्हा उपप्रमुख, शिवसेना

 

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणSatara areaसातारा परिसर