सातारा : दुचाकीकडे इशारा करून दुचाकी दाखवत असताना संशय घेऊन तीन मूकबधीर तरुणांना अमानूषपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना ललगुण, ता. खटाव येथे दि. १५ रोजी दुपारी चार वाजता घडली. याप्रकरणी पुसेगाव पोलिस ठाण्यात तिघांवर विविध कलमान्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!सुखदेव बाळासाे जाधव, गणेश बाळासो जाधव, अर्जुन बाळासो जाधव (सर्व रा. ललगुण, ता. खटाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत शांताराम आनंदराव जाधव (वय ५५, रा. डिस्कळ, ता. खटाव) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझा मुलगा करण जाधव (वय २४), करणचा अल्पवयीन मित्र तसेच सुरज जाधव (वय २०, सर्व रा. डिस्कळ, ता. खटाव) हे तिघेही मूकबधीर आहेत. हे तिघेही ललगुण गावातील एसटी स्टॅन्डजवळ दुचाकी धुण्यासाठी गेले होते. यावेळी तेथे त्यांना एक चांगली दुचाकी दिसली. एकमेकांना हाताने इशारा करून ते गाडी दाखवत होते. तेव्हा संशयित आरोपींना शंका आली. त्यांच्यावर संशय घेऊन त्यांनी लाकडी दांडके, लोखंडी पाइप, पोकळ पाइपने त्यांना बेदम मारहाण केली. यात तिघेही गंभीर जखमी झाले. घरी आल्यानंतर त्यांनी हात इशाऱ्याद्वारे घडलेला प्रकार सांगितला. यानंतर पुसेगाव पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली.
Web Summary : Three deaf-mute youths were brutally assaulted in Satara for gesturing towards a motorcycle. Police have registered a case against three individuals following the incident where the victims were attacked with wooden sticks and iron pipes.
Web Summary : सतारा में मोटरसाइकिल की ओर इशारा करने पर तीन मूक-बधिर युवाओं के साथ बेरहमी से मारपीट की गई। पुलिस ने इस घटना के बाद तीन लोगों के खिलाफ मामला दर्ज किया है, जिसमें पीड़ितों पर लकड़ी की छड़ियों और लोहे के पाइपों से हमला किया गया था।