शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : स्वच्छता अभियानात जिथं-तिथं पुड्या अन् आकड्याच्या चिठ्ठ्या, कर्मचारीही अवाक् : फलटणमध्ये गुटखा, मटका जोमात... नियंत्रण यंत्रणा कोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 19:24 IST

सातारा जिल्ह्यातील पालिकांनी स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सहभाग घेतला आहे. कर्मचारी स्वच्छता मोहिमेत सक्रिय झाले आहेत अन् नवनवीन गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. फलटण शहरात जिथं-तिथं गुटख्याच्या पुड्या अन् आकड्याच्या चिठ्ठ्या पाहायला मिळत आहे. यामुळे फलटणमध्ये मटका, गुटखा जोमात, नियंत्रण यंत्रणा कोमात अशी चर्चा रंगायला लागली आहे.

ठळक मुद्देस्वच्छता अभियानात जिथं-तिथं पुड्या अन् आकड्याच्या चिठ्ठ्या, कर्मचारीही अवाक् फलटणमध्ये गुटखा, मटका जोमात... नियंत्रण यंत्रणा कोमातकाही दिवसांतच.. ये रे माझ्या मागल्या!

फलटण : सातारा  जिल्ह्यातील पालिकांनी स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सहभाग घेतला आहे. कर्मचारी स्वच्छता मोहिमेत सक्रिय झाले आहेत अन् नवनवीन गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत.

फलटण शहरात जिथं-तिथं गुटख्याच्या पुड्या अन् आकड्याच्या चिठ्ठ्या पाहायला मिळत आहे. यामुळे फलटणमध्ये मटका, गुटखा जोमात, नियंत्रण यंत्रणा कोमात अशी चर्चा रंगायला लागली आहे.

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शहरातील रस्ते, चौक, शासकीय कार्यालये, मंदिर, शाळा परिसराची स्वच्छता केली जात आहे. सार्वजनिक ठिकाणी गुटख्याच्या पुड्या आणि मटक्याच्या चिठ्ठ्या मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत. यामुळे तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.फलटण शहरातील अनेक कार्यालयांमधील भिंती व खिडक्यांतून तंबाखू, गुटखा खाऊन थुंकताना अधिकारी, कर्मचारी आढळून येतात. यावर कोणी अंकुश ठेवायचा, असा पेच निर्माण झाला आहे. चौकाचौकांमध्ये लालभडक रस्ते आणि भिंती झालेल्या पाहायला मिळत आहेत.

मटका टपरीवर आणि भिंतींच्या पाठीमागे तरुणांसह कष्टकरी मजूर दिसत आहेत. मटक्याच्या आहारी गेल्याने त्यांचे संसार उघड्यावर येण्याची वेळ आली आहे. मटका बंद झाला व केला, असे अनेकजण सांगत असतात; परंतु उलट लपून-छपून अनेक भागांमध्ये सुरू असून, त्यांना कोण या धंद्यासाठी पाठीशी तर घालत नाही ना? असा प्रश्न जनतेमधून उपस्थित केला जात आहे.फलटण शहरासह ग्रामीण भागातील लोक या मटक्याच्या नादाला लागून स्वत:च्या संसाराची राख रांगोळी झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र या मटक्याच्या प्रकार कमी काय होताना दिसत नाही, उलट वाढतच चालले आहेत.

शहरातील अनेक टपऱ्या व दुकानात गुटखा दिवसा ढवळ्या विकला जात असून, फक्त वरवरची कारवाई आणि त्यातून आर्थिक हितसंबंध जपले जात आहेत,ह्ण असा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांमधून केला जात आहे.काही दिवसांतच.. ये रे माझ्या मागल्या!काही दिवसांपूर्वी जिंती नाका येथे अन्न व भेसळ अधिकाऱ्यांनी कारवाई केली. त्यात मोठ्या प्रमाणात गुटखा जप्त केला गेला; मात्र यानंतर उलट गावांतील अनेक दुकानांंमध्ये अजून गुटख्याची विक्री मोठ्या प्रमाणात होत असून, यासाठी सर्वच दुकानांत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाडी टाकून कारवाई करावी, अशी मागणी जनतेमधून होत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliceपोलिस