शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या दादा गटाचे सातारा, जावळीचे कारभारी ठरले; शहराध्यक्ष, तालुकाध्यक्षपदी कोणाची वर्णी..जाणून घ्या

By नितीन काळेल | Updated: January 8, 2024 17:53 IST

शहराध्यक्षपदी बाळासाहेब बाबर, तालुकाध्यक्षपदी वाईकर अन् चिकणे 

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्याअजित पवार गटाच्या पदाधिकारी निवडींना सुरुवात झाली असून सातारा तालुकाध्यक्षपदी शशिकांत वाईकर आणि जावळी अध्यक्षपदी साधू चिकणे यांची निवड करण्यात आली आहे. तर सातारा शहराध्यक्षपदी अॅड. बाळासाहेब बाबर यांची वर्णी लागली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मान्यतेनुसार विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडी करण्यात आल्या. तर जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर आणि कार्याध्यक्ष अमित कदम यांच्या अध्यक्षतेखाली निवडी पार पडल्या आहेत. सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी निवडी जाहीर करुन पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.पक्षाच्या सातारा तालुकाध्यक्षपदी शशिकांत वाईकर, जावळी तालुकाध्यक्षपदी साधू चिकणे यांची निवड करण्यात आली. याबाबत त्यांना नियुक्तीपत्रही देण्यात आले आहे. तसेच पक्षाच्या इतर विभागांच्या निवडीही जाहीर झाल्या आहेत. त्यानुसार महिला आघाडीच्या सातारा शहराध्यक्षपदी संगिता देशमुख, अल्पसंख्यांक विभाग सातारा तालुकाध्यक्षपदी शमशुद्दीन सय्यद (कोंडवे), ओबीसीच्या विभागाच्या सातारा शहराध्यक्षपदी संजय बनकर यांची निवड करण्यात आली आहे. तर सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघ अध्यक्षपदी रवींद्र शेलार, कार्याध्यक्षपदी महेश पाटील आणि सातारा जिल्हा चिटणीसपदी प्रकाश कदम यांची निवड झाली आहे.राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस श्रीनिवास शिंदे, जावळी सहकारी बॅंकेचे संचालक योगेश गोळे, प्रकाश कोकरे, शिवाजीराव देशमुख, वैशाली सुतार, संदीप भोसले यांच्या उपस्थितीत या निवडी झाल्या.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार