शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Satara: घरातून चिमुकली गायब; शोधण्यासाठी ड्रोन, श्वान पथक, शंभर पोलिस रात्रभर झटले, सीसीटीव्हीत दिसली, पण..

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 16:22 IST

सर्वांत मोठे सर्च ऑपरेशन

सातारा : घरातून गेलेल्या नऊ वर्षांच्या मुलीला शोधण्यासाठी सातारा शहर पोलिसांनी शनिवारी रात्री मोठे सर्च ऑपरेशन राबविले. ड्रोन, श्वान पथक, शंभर पोलिस तसेच स्थानिक नागरिकांनी यात सहभाग घेऊन बारा तासांत मुलीला शोधून काढले. जिल्हा पोलिस दलातील आतापर्यंतचे हे सर्वांत मोठे सर्च ऑपरेशन ठरले.साताऱ्यातील सदर बझारमध्ये एक परप्रांतीय कुटुंब वास्तव्यास आहे. या कुटुंबातील नऊ वर्षांची मुलगी शनिवारी सायंकाळी पाच वाजता राहत्या घरातून अचानक गायब झाली. रात्री उशिरापर्यंत मुलगी घरी न आल्याने कुटुंबीय चिंतेत पडले. धावतच कुटुंबीय सातारा शहर पोलिस ठाण्यात आले. पोलिसांना मुलगी गायब झाल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर तातडीने सूत्रे हलली.वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहर पोलिस ठाण्यातील शंभर पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. रात्रीची वेळ असल्याने मुलीच्या बाबतीत बरेवाईट होऊ नये, यासाठी कुटुंबीयांसह पोलिसही चिंतेत होते. पोलिसांनी वेगवेगळ्या टीम तयार करून सर्च ऑपरेशन सुरू केले. पोलिसांच्या मदतीला स्थानिक नागरिकही धावून आले.एमआयडीसीतील निर्जन ठिकाणे, बसस्टेशन, रेल्वे स्टेशन, झाडी, झुडपे, आजूबाजूची शेती, विहिरी तसेच सुमारे १५ सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. संपूर्ण परिसर रात्रभर पोलिसांनी पिंजून काढला. यामध्ये पोलिस दलाचे श्वान पथक, तीन ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे शोध घेतला जात होता, तर दुसरीकडे सोशल मीडियावरही मुलीचे फोटो पाठवून माहिती घेतली जात होती.असे असतानाच रविवारी सकाळी पोलिसांच्या पथकाला आनंदाची बातमी येऊन थडकली. संबंधित मुलगी तिच्या शाळेतील मैत्रिणीच्या घरी सुखरूप असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी तेथे जाऊन मुलीला पालकांच्या स्वाधीन केले. मुलीला पाहून पालकांना आपले अश्रू अनावर झाले. पोलिसांच्या या प्रयत्नाबद्दल स्थानिक नागरिक व मुलीच्या कुटुंबीयांनी सर्व पोलिसांचे आभार मानून सत्कार केला.

सीसीटीव्हीत ती दिसली, पण..संबंधित मुलगी घरातून एकटी जाताना सीसीटीव्हीत दिसून आली. पण, पुढे कोठे गेली हे दिसले नाही. तिच्या घरापासून मैत्रिणीचे घर साधारण दीड किलोमीटर अंतरावर आहे. मैत्रिणीकडे गेल्यानंतर तिने आईला मी सांगून आले आहे. तुमच्याकडे राहणार आहे, असे सांगितल्यामुळे त्या कुटुंबालाही काही शंका आली नाही.

या पथकाने निर्जन ठिकाणे शोधून काढली..पोलिस अधिकारी समाधान बिले, ए. एस. कांबळे, अशोक सावंजी, सुधीर मोरे, अनिल जायपत्रे, शामराव काळे, महिला उपनिरीक्षक अक्षदा इंगळे, हवालदार श्रीनिवास घाडगे, नीलेश यादव, सुजित भोसले, धनाजी यादव, राहुल घाडगे, अनिल सावंत, पंकज मोहिते, विक्रम माने, तुषार भोसले, नीलेश जाधव, अजिंक्य माने, दीपक गुरव, दीपक ताटे, महेंद्र पाटोळे, महेश देशमुख, दीपक इंगवले, इम्रान मेटकरी, समीर महांगडे, महिला सहायक फौजदार अनुभुले, पद्मीनी जायकर, सागर गायकवाड, सुहास कदम, राहुल फडतरे, सुशांत कदम, विशाल धुमाळ व अन्य कर्मचारी तसेच स्थानिक नागरिक या कार्यवाहीत सहभागी होते.