सातारा : आरोग्य सांभाळा...!

By Admin | Updated: September 20, 2014 00:34 IST2014-09-19T22:51:11+5:302014-09-20T00:34:16+5:30

तापाचे रुग्ण वाढले : दवाखाने झाले फुल्ल

Satara: Careful health ...! | सातारा : आरोग्य सांभाळा...!

सातारा : आरोग्य सांभाळा...!

सातारा : सप्टेंबर महिन्यात गणपतीच्या आगमनापासून पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली होती. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात पाऊस कमी झाला. मात्र, अशा बदलत्या वातावरणाचा परिणाम सातारकरांच्या आरोग्यावर झालेला दिसून आला आहे. सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये तापाचे अनेक रुग्ण आढळून आले, यात प्रामुख्याने लहानग्यांची संख्या अधिक आहे.
गणपती बाप्पांच्या आगमनानंतर पावसाची संततधार सुरू झाली होती. ऊन, पाऊस आणि गारठा अशा तिन्ही ऋतूंचे टप्पे एका दिवसातच अनुभवायला मिळत होते. सकाळी ऊन, दिवसा पाऊस आणि रात्री थंडी अशा विचित्र वातावरणामुळे गेल्या काही दिवसांत आजारी पडणाऱ्यांची संख्या चांगलीच वाढली होती. सकाळी ठणठणीत बरे असणारेही दुपारी आडवे होत असल्याचे चित्र अनेक घरांमध्ये दिसत होते.
घरातील छोट्यांची तर यापेक्षा वाईट अवस्था होती. दिवसभर आपल्या बाललीलांनी अवघे घर डोक्यावर घेणारे चिमुकलेही चिडीचूप झाले होते. तापाने फणफणलेल्या या चिमुकल्यांचा रडवेला चेहरा कुटुंबीयांना क्लेशकारक वाटत होता.
घरातील प्रत्येकाला सूचना देऊन देऊन बेजार करणारे ज्येष्ठही अंथरूणाला खिळले आहेत. सकाळी लवकर उठून सर्वांना सूचना देत अवघ्या कुटुंबाला एका रेषेत चालायला लावणारे हे शेर ढेर झाले होते.
ज्येष्ठांमध्ये प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे त्यांना या आजाराचा सर्वाधिक त्रास झाला.
सहसा कोणाचेही न ऐकणारे ज्येष्ठ वैद्यकीय सल्ल्याचे तंतोतंत पालन करून लवकर बरे होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. घरातील या आजारमय वातावरणामुळे अवघे कुटुंब त्रासून गेले आहे. (प्रतिनिधी)

स्थानिक प्रशासनाच्या उपाययोजना
पावसाळ्यानंतर अनेक ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून फवारणी करण्यात येते. यावर्षी पालिका आणि ग्रामपंचायत भागांमध्ये ही फवारणी झाली. ग्रामीण भागात ज्यांना बंदिस्त पाईपमधून पाणी मिळत नाही, अशा सर्वांना ‘मेडिक्लोर’चे मोफत वाटप करण्यात आले. जिल्हा शासकीय रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येही तापामुळे आजारी असलेल्या बालकांवर तातडीने उपचार करून त्यांना घरी सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ग्रुग्णालय झाली हाऊसफुल्ल!
ोल्या काही दिवसांपासून तापाची साथ चांगलीच वाढली आहे. त्यामुळे अबाल वृद्धांची गर्दी दवाखान्यात झाली आहे. शहरातील काही नामांकित रुग्णालयांनी तर चक्क जागा नाही म्हणून रुग्णांना अन्य दवाखान्यात जाण्याचे सल्ले दिले. तर काही रुग्णालयांनी दोन खाटांच्यामध्ये गादी टाकून रुग्णांवर उपचार केले. सकाळी लवकर नंबर लावाला तरच दुपारी नंबर येतो. त्यामुळे आजारी रुग्णांचे नातेवाईक फोनवरुनच डॉक्टरांची अपार्इंटमेंट घेताना पाहायला मिळत आहेत.

१कधी नव्हे इतका पाऊस यावर्षी सातारकरांनी अनुभवला. त्यामुळे अनेक आजार मोठ्या प्रमाणावर पसरले जातात. या दिवसांत अशुध्द पाण्यामुळेही रोगराई पसरण्याची भीती असते. म्हणून पाणी उकळून पिणे आणि बाहेरील उघड्यावरील अन्न खाणे टाळले पाहिजे.
- डॉ. अच्युत गोडबोले
२पावसाळ्याच्या दिवसांत मुलांना खूप भूक लागते. वातावरणात बदल होत असल्यामुळे या बदलाबरोबर पुढे जाताना मुलांच्या स्वच्छतेची काळजी घेणे आवश्यक आहे. अस्वच्छतेमुळेही मुले या दिवसात आजारी पडतात.
- डॉ़ स्वाती श्रोत्री
३दमट वातावरण आणि पाण्यामुळे डेंग्यू आणि मलेरियाचा आजार होतो. त्यामुळे शक्यतो घरातील वातावरण कोरडे राहील, यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. स्वच्छतेच्या सवयीचा अवलंब होणे आवश्यक आहे.
- डॉ. विकास जाधव

Web Title: Satara: Careful health ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.