शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

सातारा :शॉर्टसर्किटनं लागलेल्या आगीत माडी खाक, गॅस सिलिंडरचाही स्फोट : पिंपोडे बुद्रुक ग्रामस्थांची आग विझविण्यासाठी धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 12:21 IST

कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक येथील बाजारपेठेत असलेल्या एका जुन्या घराला शॉर्टसर्किटमुळे शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास आग लागली. आगीत गॅस सिलिंडरचाही स्फोट झाला. या घटनेत मोठे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे. सुमारे दोन तासांच्या प्रयत्नांनंतरही आग विझविण्याचे काम सुरू आहे. या आगीची झळ आजूबाजूच्या घरांनाही पोहोचली आहे. ​​​​​​​

ठळक मुद्देसकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास आग आग विझविण्यासाठी ग्रामस्थ, तरुणांनी घेतली धाव भुर्इंज येथील किसन वीर साखर कारखान्याचा बोलाविला अग्निशमन बंब दोन तासांच्या प्रयत्नांनंतरही आग विझविण्याचे काम सुरू

पिंपोडे बुद्रुक (सातारा) : कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक येथील बाजारपेठेत असलेल्या एका जुन्या घराला शॉर्टसर्किटमुळे शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास आग लागली. आगीत गॅस सिलिंडरचाही स्फोट झाला. या घटनेत मोठे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे.याबाबत माहिती अशी की, पिंपोडे बुद्रुक येथील बाजार पेठेत विक्रम महाजन यांचे माडीचे जुने घर आहे. घरात काहीजण असतानाच अचानक शॉर्टसर्किटमुळे आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच घरातील मंडळी बाहेर धावत आली.आग विझविण्यासाठी ग्रामस्थ व तरुणांनी धाव घेतली. भुर्इंज येथील किसन वीर सहकारी साखर कारखान्याचा अग्निशमन बंब बोलाविला. मात्र तो येण्यास उशीर झाला.

दरम्यानच्या काळात ही आग वाढत गेल्याने स्वयंपाक घरातील सिलिंडरचा स्फोट झाला. यामुळे आगीने रुद्र रूप धारण केले. सुमारे दोन तासांच्या प्रयत्नांनंतरही आग विझविण्याचे काम सुरू आहे. या आगीची झळ आजूबाजूच्या घरांनाही पोहोचली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरfireआग