शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

सातारा : भांडणे सोडविली म्हणून डोक्यात बॅट मारली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 13:39 IST

भांडणे सोडविल्याच्या कारणावरून लाकडी बॅट डोक्यात मारून जखमी केल्याप्रकरणी गणेश जयसिंग भोसले यांच्यावर रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देभांडणे सोडविली म्हणून डोक्यात बॅट मारलीरहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

रहिमतपूर : भांडणे सोडविल्याच्या कारणावरून लाकडी बॅट डोक्यात मारून जखमी केल्याप्रकरणी गणेश जयसिंग भोसले यांच्यावर रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवार, दि. २ जुलै रोजी तक्रारदार युवराज गणपती कदम (वय ५१, रा. नहरवाडी, ता. कोरेगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते दुचाकीवरुन रहिमतपूरकडे निघाले होते. त्यावेळी बसस्थानक परिसरात त्यांच्याच गावातील काही युवकांची आणि गणेश जयसिंग भोसले यांच्यात कोणत्या तरी कारणावरून भांडणे सुरू होती.

यावेळी फिर्यादी युवराज कदम यांनी मध्यस्थी करून भांडणे सोडवली. त्यानंतर ते गावातील लग्नानिमित्त आदर्श फाटा येथील एका मंगल कार्यालयात गेले. लग्न उरकून येत असताना गणेश भोसले व त्याचा एक अनोळखी साथीदार यांनी रस्त्यात अडवून आमच्या भांडणात का पडला, असे म्हणून शिवीगाळ व दमदाटी केली.

त्यावेळी गणेश भोसले याने लाकडाच्या बॅटने डोक्यात मारहाण करून गंभीर जखमी केले. या घटनेचा अधिक तपास हवालदार एस. डी. नाळे हे करीत आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हाSatara areaसातारा परिसर