शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

Satara Bank Results LIVE: पाटणमधून गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई पराभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2021 11:09 IST

सातारा : जिल्हा बँक निवडणूक निकाल लागण्यास सुरुवात झाली आहे. सकाळपासून सुरु असलेल्या मतमोजणीत धक्कादायक निकाल समोर येत आहेत. ...

सातारा : जिल्हा बँकनिवडणूक निकाल लागण्यास सुरुवात झाली आहे. सकाळपासून सुरु असलेल्या मतमोजणीत धक्कादायक निकाल समोर येत आहेत. विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांचा १ मतांनी पराभव झाला आहे. ज्ञानदेव रांजणे यांनी आमदार शिंदे यांचा पराभव केला आहे.  शशिकांत शिंदे यांना 24 तर ज्ञानदेव रांजणे यांना 25 मते मिळाली.नागरी सहकारी बँक असोसिएशनच्या सभागृहामध्ये सकाळी आठ वाजल्यापासून ही मतमोजणी प्रक्रिया सुरु आहे. तर आता जाणून घेवूयात कोणत्या मतदार संघात कोणाचा विजयी झाला ते लाईव्ह अपडेट मधून...जावली प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघ

उमेदवार                    मिळालेली मतेशशिकांत शिंदे              24ज्ञानदेव रांजणे               25

पाटण प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघातून सत्यजितसिंह पाटणकर 58 मते मिळवून विजयी झाले आहेत. माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे सुपूत्र आहेत. महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा त्यांनी पराभव केला असून त्यांच्यासाठी हा निकाल धक्कादायक आहे. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना 44 तर सत्यजितसिंह पाटणकर 58 मते मिळाली.पाटण प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघउमेदवार                                  मिळालेली मतेशंभूराज देसाई                             44सत्यजितसिंह पाटणकर                    58

कराड प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघातून महसुल मंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील हे 74 इतकी मते घेऊन विजयी झाले असून त्यांनी उदयसिंह पाटील यांचा 8  इतक्या मतांनी पराभव केला आहे. या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. येथील लढत पालकमंत्री बाळासाहेब पाटील विरुद्ध माजी मंत्री दिवंगत विलासराव पाटील-उंडाळकर यांचे सुपूत्र उदयसिंह पाटील यांच्यात झाली होती. बाळासाहेब पाटील यांना 74 तर उदयसिंह पाटील यांना 66 मते मिळाली.

कराड प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघ

उमेदवार                        मिळालेली मतेबाळासाहेब पाटील                74उदयसिंह पाटील                   66

कोरेगाव आणि माण प्राथमिक कृषी पतपुरवठा गट

कोरेगाव आणि माण प्राथमिक कृषी पतपुरवठा गटातील उमेदवारांना समान मते मिळाली आहेत. त्यामुळे येथे चिठ्ठी टाकून विजय उमेदवाराची घोषणा केली जाणार आहे. कोरेगावमध्ये सुनील खत्री आणि शिवाजीराव महाडिक यांना प्रत्येकी पंचेचाळीस मते मिळालेले आहेत. येथे 90 मतदान झाले होते. शेखर गोरे आणि मनोज पोळ यांना प्रत्येकी 36 मते मिळाली आहेत. येथे एकूण 74 तर मते होती. मात्र मतदानादिवशी 72 मतदान झाले होते दोन मतदारांनी मतदान प्रक्रियेचे पाठ फिरवली होती.

खटाव सोसायटी गटात धक्तादायक निकाल लागला आहे. कारण या मतदार संघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उमेदवारी दिलेल्या नंदकुमार मोरेंचा पराभव झाला आहे. प्रभाकर घार्गे यांनी मोरे यांचा पराभव केला आहे. नंदकुमार मोरेंना ४६ मते तर प्रभाकर घार्गे ५६ मते मिळाली आहेत.

खटाव सोसायटी गट

उमेदवार                        मिळालेली मतेनंदकुमार मोरेंना                    ४६प्रभाकर घार्गे                       ५६ बँक व पतसंस्था गटात रामराव लेंभे विजयी झाले आहेत. रामराव लेंभे यांना ३०७ तर सुनील जाधव यांना ४७  मते मिळाली आहेत.

बँक व पतसंस्था गट

उमेदवार                        मिळालेली मतेरामराव लेंभे                      ३०७सुनील जाधव यांना              ४७ 

इतर मागास प्रवर्ग मतदारसंघात शेखर गोरे यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. प्रदीप विधाते यांनी गोरे यांना पराभवाची धुळ चारली. शेखर गोरे 379 मते मिळाली. तर, प्रदीप विधाते यांनी 1459 मते मिळवत गोरे यांचा मोठा फरकाने पराभव केला.

इतर मागास प्रवर्ग मतदारसंघ

उमेदवार                        मिळालेली मतेशेखर गोरे                         379प्रदीप विधाते                    1459

महिला प्रवर्ग गट

महिला प्रवर्ग गटात राष्ट्रवादीच्या ऋतुजा पाटील व कांचन साळुंखे विजयी झाल्या आहेत. ऋतुजा पाटील यांना १४४५ व  कांचन साळुंखे यांना १२९२ मते मिळाली. त्यानी अनुक्रमे शारदादेवी कदम व चंद्रभागा काटकर यांचा पराभव केला. शारदादेवी कदम यांना ६१८ तर चंद्रभागा काटकर यांना १४१ मते मिळाली.

अकरा जागा यापूर्वीच बिनविरोधजिल्हा बँकेच्या २१ जागांपैकी अकरा जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित दहा जागांसाठी रविवारी दि.२१ मतदान झाले. जिल्ह्यातील ११ तालुक्यांमधून ९६ टक्के मतदान झाले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरbankबँकElectionनिवडणूकShambhuraj Desaiशंभूराज देसाई