शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

सातारा : उच्च न्यायालयाकडून दोन्ही राजेंच्या १९ समर्थकांना जामीन, साताऱ्यात न फिरकण्याची अट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 16:54 IST

सुरुचि धुमचश्क्रीप्रकरणी खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या १९ कार्यकर्त्यांना उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला. चार्ज दाखल होत नाही तोपर्यंत संबंधितांना सातारा शहर आणि तालुक्याच्या हद्दीत प्रवेश करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

ठळक मुद्देउच्च न्यायालयाकडून दोन्ही राजेंच्या १९ समर्थकांना जामीनसाताऱ्यात न फिरकण्याची अट

सातारा : सुरुचि धुमचश्क्रीप्रकरणी खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या १९ कार्यकर्त्यांना उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला. चार्ज दाखल होत नाही तोपर्यंत संबंधितांना सातारा शहर आणि तालुक्याच्या हद्दीत प्रवेश करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.आनेवाडी टोलनाक्याच्या हस्तांतरावरून झालेल्या वादातून सुरुचिवर गेल्या चार महिन्यांपूर्वी दोन्ही राजेंच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमचश्क्री उडाली होती. याप्रकरणी दोन्ही गटांतील सुमारे तीनशेहून अधिक कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. काहीना अटक तर काहीनी उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.खासदार उदयनराजे गटाचे समर्थक किशोर शिंदे, जीवन निकम, अमोल आवळे, अमर किर्दत, सनी भोसले, पंकज चव्हाण आणि विकी यादव या सातजणांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. तर आमदार गटाचे जयेंद्र चव्हाण, अन्सार अत्तार, मुक्तार पालकर, अमोल मोहिते, मयूर बल्लाळ यांच्यासह १२ जणांचा जामीन मिळाल्यामध्ये समावेश आहे.सुरुचि धुमचश्क्रीप्रकरणी काही महिन्यांपूर्वीच आरोपपत्र दाखल झाले आहे. मात्र चार्ज (गुन्हा कबुल आहे की नाही) दाखल होत नाही. तोपर्यंत या १९ जणांना सातारा शहर आणि सातारा तालुक्यात न फिरकण्याची अट न्यायालयाने घातली आहे.

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेSatara areaसातारा परिसरShivendrasinghraja Bhosaleशिवेंंद्रसिंहराजे भोसलेCrimeगुन्हा