शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : एक्स्प्रेसला थांबा नसल्याने जवानांसह कुटुंबीयांची परवड, रहिमतपूर रेल्वे स्टेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 14:04 IST

कोरेगाव तालुक्यातील महत्त्वाचे असलेल्या रहिमतपूर रेल्वे स्थानकात दोन एक्स्प्रेस वगळता इतर कोणत्याच एक्स्प्रेस गाड्या थांबत नाहीत. त्यामुळे सीमेवर देशसेवा बजावत असलेल्या जवानांसह त्यांच्या कुटुंबीयांची परवड होत आहे. व्यापाऱ्यांनाही धार्मिक ठिकाणी जाताना गैरसोय होत आहे. त्यामुळे रात्री-अपरात्री सातारा रेल्वेस्थानक गाठावे लागत आहे.

ठळक मुद्देरहिमतपूर रेल्वे स्थानकात थांबत नाहीत एक्स्प्रेस गाड्या एक्स्प्रेसला थांबा नसल्याने जवानांसह कुटुंबीयांची परवडरात्री-अपरात्री गाठावा लागतोय सातारा

रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील महत्त्वाचे असलेल्या रहिमतपूर रेल्वे स्थानकात दोन एक्स्प्रेस वगळता इतर कोणत्याच एक्स्प्रेस गाड्या थांबत नाहीत. त्यामुळे सीमेवर देशसेवा बजावत असलेल्या जवानांसह त्यांच्या कुटुंबीयांची परवड होत आहे. व्यापाऱ्यांनाही धार्मिक ठिकाणी जाताना गैरसोय होत आहे. त्यामुळे रात्री-अपरात्री सातारा रेल्वेस्थानक गाठावे लागत आहे.कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर शहराला प्राचीन व ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. राज्यातील पहिली व देशातील दुसरी नगरपरिषद म्हणूनही रहिमतपूरची ओळख आहे. रहिमतपूरपासून चार किलोमीटर अंतरावर रेल्वे स्टेशन असून धामणेर रेल्वे स्टेशन म्हणूनही ओखले जाते. परंतु त्याची नोंद रहिमतपूर रेल्वे स्टेशन अशीच आहे. या रेल्वे स्टेशनचा म्हणावा असा विकास झालेला नाही.ब्रिटिश काळापासून असलेल्या सुविधांमध्ये किरकोळ अपवाद वगळता कोणताही बदल झालेला दिसत नाही. एका पटरीवरुनच रेल्वे गाड्या धावतात. क्रॉसिंगसाठी दुसरीही पटरी आहे. रेल्वेमार्गाच्या दोन्ही बाजुला रेल्वेची मुबलक जागा आहे. मात्र या जागेच्या विकासाकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष नसल्याचे जाणवत आहे.सातारा जिल्हा हा शूरवीर जवानांचा म्हणून ओळखला जातो. कोरेगाव तालुक्यातील बहुधा प्रत्येक गावातील युवक सैन्यात कार्यरत आहेत. रहिमतपूर शहरासह परिसरातील व खटाव तालुक्यातील सुमारे शंभर गावातील वाड्यावस्त्यांवरील जवांना महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपºयात प्रवास करण्यासाठी सोयीचा प्रवास रहिमतपूर रेल्वे स्टेशनच्या माध्यमातून उपलब्ध आहे.

मात्र, या स्टेशनवर पॅसेंजर, कोयना एक्स्प्रेस, महाराष्ट्र एक्स्पे्रस याच गाड्या थांबतात. इतर महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्या थांबत नसल्याने जवानांसह त्यांच्यारबरोबर ये-जा करणाऱ्या कुटुंबीयांची गैरसोय होते.या स्टेशनवरुन चोवीस तासांत वीस ते पंचवीस गाड्या धावतात. देशसेवा बजावणाऱ्या जवानांना प्रामुख्याने जम्मू-काश्मिर, श्रीनगर, पंजाब, दिल्ली, राजस्थान, चंदीगड, नागालँड, आसाम आदी ठिकाणी जावे लागते. ज्या ज्या ठिकाणी कुटुंबीयांना राहण्याची सोय आहे.

त्या ठिकाणी जाणाऱ्या रेल्वेची वेळ रात्री-अपरात्री दुपारची कधीचीही असू शकते. त्यामुळे त्यांना सातारा रेल्वेस्थानकात सोडून येताना अपघात घडत आहेत. त्यामुळे रहिमतपूर रेल्वे स्टेशनमध्ये एक्स्प्रेसला थांबा देण्याची गरज निर्माण झाली आहे.या एक्स्प्रेसंना हवाय थांबारहिमतपूर रेल्वे स्थानकात गोवा-निजामुद्दीन, जोधपूर, महालक्ष्मी, हुबळी, चंदीगड एक्स्प्रेस थांबणे गरजेच्या आहेत. त्यातील गोवा-निजामुद्दीन एक्स्प्रेस सातारा व कऱ्हाड येथे थांबते. या सर्व गाड्यांना रहिमतपूरलाही थांबा देणे गरजेचे आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRailway Passengerरेल्वे प्रवासी