lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > रेल्वे जोडणार इस्त्रोच्या सॅटेलाइटशी, गाड्यांची मिळेल निश्चित माहिती

रेल्वे जोडणार इस्त्रोच्या सॅटेलाइटशी, गाड्यांची मिळेल निश्चित माहिती

फलाटावर रेल्वेची वाट पाहण्यात तासन्तास वाया घालण्यापेक्षा आपल्याला ज्या रेल्वेतून प्रवास करायचा आहे, ती सध्या कोणत्या ठिकाणी आहे, किती वेळात आपल्या स्टेशनवर येणार, हेच कळल्यास? हीच सुविधा आता रेल्वेने प्रवास करणा-यांंसाठी सुरू होणार आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 04:16 AM2018-01-04T04:16:23+5:302018-01-04T04:17:09+5:30

फलाटावर रेल्वेची वाट पाहण्यात तासन्तास वाया घालण्यापेक्षा आपल्याला ज्या रेल्वेतून प्रवास करायचा आहे, ती सध्या कोणत्या ठिकाणी आहे, किती वेळात आपल्या स्टेशनवर येणार, हेच कळल्यास? हीच सुविधा आता रेल्वेने प्रवास करणा-यांंसाठी सुरू होणार आहे.

 Railway will connect to Istro's satellite, trains get definite information | रेल्वे जोडणार इस्त्रोच्या सॅटेलाइटशी, गाड्यांची मिळेल निश्चित माहिती

रेल्वे जोडणार इस्त्रोच्या सॅटेलाइटशी, गाड्यांची मिळेल निश्चित माहिती

नवी दिल्ली - फलाटावर रेल्वेची वाट पाहण्यात तासन्तास वाया घालण्यापेक्षा आपल्याला ज्या रेल्वेतून प्रवास करायचा आहे, ती सध्या कोणत्या ठिकाणी आहे, किती वेळात आपल्या स्टेशनवर येणार, हेच कळल्यास? हीच सुविधा आता रेल्वेने प्रवास करणा-यांंसाठी सुरू होणार आहे.
रेल्वे प्रशासन सर्व गाड्यांची इंजिने वर्षभरात इस्रो उपग्रहाशी जोडणार आहे. त्यानंतर संबंधित गाडी कोठे आहे, किती वेळात पोहोचू शकेल, ही माहिती मिळू शकणार आहे. त्यातून प्रवाशांचा प्रतीक्षेचा वेळ वाचेल. तसेच योग्य वेळी गाडीतील कर्मचाºयांशी संपर्क साधणे सोपे होईल, असे रेल्वेच्या अधिकाºयाने सांगितले.

१०,८०० इंजिनांवर अँटेना बसवणार 

या वर्षअखेर रेल्वेच्या १०,८०० इंजिनांवर अँटेना बसवलेले असतील आणि त्या अ‍ॅटेनामार्फंत चालकाशी संपर्क साधणे शक्य होईल.
हा प्रयोग १० इंजिनांवर केला गेला असून या वर्षी डिसेंबरअखेर ही यंत्रणा सगळ््या इंजिनांवर बसलेली असेल.
या व्यवस्थेची चाचणी नवी दिल्ली- गुवाहाटी आणि नवी दिल्ली-मुंबई राजधानी मार्गांवर सहा गाड्यांच्या इंजिनांवर केल्याचेही त्याने सांगितले.

रेल्वे क्रॉसिंगवरही वाजतील भोंगे

पहारेकरी नसलेल्या रेल्वे क्रॉसिंगवरील व रेल्वे मार्गांवरील अपघात टाळण्यासाठी व रेल्वेच्या प्रवासाची माहिती घेण्यासाठी
रेल्वे भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) उपग्रहांचा
वापर करील.
रेल्वेने इस्रोने विकसित केलेल्या इंटिग्रेटेड सर्किट (आयसी चिप्स) चिप्स काही रेल्वेच्या इंजिनांवर बसवल्या आहेत.
पहारेकरी नसलेल्या रेल्वे क्रॉसिंगवर रेल्वे येत असेल तर तेथील रस्त्याचा वापर करणाºयांना भोंग्याचा आवाज काढून सावध करण्यासाठी द इंडियन रिजनल नॅव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम वापरली जाईल.

 

Web Title:  Railway will connect to Istro's satellite, trains get definite information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.