शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : मध्यप्रदेशातील महाराजांचा अपघाती मृत्यू, चार शिष्य जखमी, टँकरला ओव्हरटेक करताना कार उलटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 18:54 IST

खटाव तालुक्यातील धोंडेवाडी येथे गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास टँकरला ओव्हरटेक करत असताना कार चालकाचा ताबा सुटल्याने कार उलटली. यात मध्यप्रदेशामधील श्रीराम समर्थ कुटी आश्रमाचे श्रीराम महाराज रामदासी (मूळ रा. गोंदवले, ता. माण) यांचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देधोंडेवाडी येथे महावितरण उपकेंद्रानजीक टँकरला ओव्हरटेक करताना अपघातचालकाचा ताबा सुटल्याने कार उलटलीश्रीराम महाराज रामदासी यांचा रुग्णालयात उपचारापूर्वीच मृत्यू

वडूज (सातारा) : खटाव तालुक्यातील धोंडेवाडी येथे गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास टँकरला ओव्हरटेक करत असताना कार चालकाचा ताबा सुटल्याने कार उलटली. यात मध्यप्रदेशामधील श्रीराम समर्थ कुटी आश्रमाचे श्रीराम महाराज रामदासी (मूळ रा. गोंदवले, ता. माण) यांचा मृत्यू झाला.याबाबत माहिती अशी की, मध्यप्रदेशला जाण्यासाठी गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कारमधून (एमएच १३ सीयू १३१३) ते निघाले होते.

दरम्यान, धोंडेवाडी येथे नवीन महावितरण उपकेंद्रानजीक टँकरला ओव्हरटेक करत असताना चालकाचा ताबा सुटल्याने कार उलटली. या अपघातात कारमधील त्यांचे चार शिष्यही जखमी झाले.श्रीराम महाराज रामदासी यांना सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

शवविच्छेदनानंतर रात्री उशिरा त्यांचे पार्थिव मध्यप्रदेशमधील बडवाह या गावी नेण्यात आले. खेडीघाटमध्ये श्रीराम समर्थ कुटी आश्रमाचे ते संस्थापक होते. त्यांचे मध्यप्रदेश व देशभरात अनेक ठिकाणी भक्त आहेत. त्यांचे मूळगाव गोंदवले, ता. माण आहे. सातारा शहर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. अधिक तपासासाठी वडूज पोलिस ठाण्याकडे गुन्हा वर्ग करण्यात आला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघात