शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीतील पथसंचलनात झळकणार सातारचा ऋषिकेश थोरात, देशसेवेत थोरात कुटुंबांची तिसरी पिढी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 17:02 IST

अजय जाधव उंब्रज: दिल्लीच्या राजपथावर ५ वर्ष सैन्यदलाने दिलेले कर्तव्य ज्या सैनिक जवानाने पार पाडले. त्याच राजपथावर प्रजासत्ताक दिनी ...

अजय जाधवउंब्रज: दिल्लीच्या राजपथावर ५ वर्ष सैन्यदलाने दिलेले कर्तव्य ज्या सैनिक जवानाने पार पाडले. त्याच राजपथावर प्रजासत्ताक दिनी मानाचे समजणाऱ्या संचलनात 'त्या' सैनिकांच्या सैनिक मुलाची देशातून मोजक्या जवानांच्यामध्ये निवड झालीय. हे घडवलेय कराड तालुक्यातील कंळत्रेवाडी येथील थोरात कुटुंबांच्या देशसेवा करणाऱ्या तिसऱ्या पिढीने. जवान ऋषिकेश राजेंद्र थोरात याने.२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त दरवर्षी भारतीय सैन्य दलाकडून राजपथावर पथसंचलन होते. याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले असते. या पथसंचलनात सहभागी होण्याचे प्रत्येक जवानांचे स्वप्न असते. असेच स्वप्न पाहणाऱ्या ऋषिकेश थोरात यांची गेल्या वर्षी सैन्यदलात निवड झाली. त्याचे आजोबा बाजीराव रामचंद्र थोरात हे सैन्यदलात होते. त्यानंतर वडील राजेंद्र थोरात आणि आता ऋषीकेश हा ही सैन्यदलात सेवा बजावत आहे. सीमेवरील देशसेवेचा दैदीप्यमान वारसा या तिसऱ्या पिढीनेही पुढे चालवला आहे.ज्या राजपथावर सैनिक ऋषिकेश थोरात संचलन करणार आहे. त्या राजपथावर ऋषिकेशचे वडील माजी सैनिक राजेंद्र थोरात यांनी मराठा लाइफ इन्फन्ट्रीच्या वन आर्मी हेडकॉटरच्या सिग्नल रेजिमेंट मध्ये ५ वर्ष कर्तव्य बजावले होते. त्याच राजपथावर ऋषिकेश याची देशातील मोजक्या सैनिकात निवड झाली आहे. पाहिलेले स्वप्न पूर्ण मी सैन्यदलात असताना मराठा लाइफ इन्फन्ट्रीच्या वन आर्मी हेडकॉटरच्या सिग्नल रेजिमेंटच्या माध्यमातून ५ वर्ष राजपथावर कर्तव्य बजावले. त्यावेळी मला वाटायचे की भविष्यात ऋषिकेश या संचलनात सहभागी होऊ शकेल का...त्या वेळी मी पाहिलेले स्वप्न आता पूर्ण होत आहे. याचा नक्की अभिमान वाटतो.  - राजेंद्र थोरात, माजी सैनिक, ऋषिकेशचे वडील 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरIndian Armyभारतीय जवानRepublic Dayप्रजासत्ताक दिन