जिल्ह्यात सरपंच निवड पुढील आठवड्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:16 IST2021-02-05T09:16:02+5:302021-02-05T09:16:02+5:30
उपसरपंचही ठरणार : ८ ते १० फेब्रुवारी रोजी होणार निवड लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात नुकत्याच निवडणूक झालेल्या ...

जिल्ह्यात सरपंच निवड पुढील आठवड्यात
उपसरपंचही ठरणार : ८ ते १० फेब्रुवारी रोजी होणार निवड
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यात नुकत्याच निवडणूक झालेल्या ८७८ ग्रामपंचायतीमध्ये सरपंच उपसरपंच निवडीचा कार्यक्रम ८ ते १० फेब्रुवारी या या कालावधीत घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिलेले आहेत. पदाधिकारी निवडीच्या अनुषंगाने तहसीलदार विशेष सभेची नोटीस लवकरच काढणार आहेत.
जिल्ह्यात ८७८ ग्रामपंचायतींची निवडणूक लागली होती त्यापैकी २२३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या तर ६५२ ग्रामपंचायतीसाठी प्रत्यक्ष जोरदार धुमशान झाले. तीन ग्रामपंचायतीसाठी एक ही नाम निर्देशन पत्र प्राप्त झालेले नव्हते. ग्रामविकास खात्याने सरपंच आरक्षण सोडत कार्यक्रम तसेच सरपंच व उपसरपंच निवड राबविण्याचे निश्चित केले आहेत त्यानुसार सरपंच व उपसरपंच निवडीची पहिली विशेष सभा एका दिवशी घेणे शक्य होणार नसल्याने महसूल विभागाने तीन दिवसांचे यासाठी नियोजन केलेले आहे त्या नुसार ८, ९ आणि १० फेब्रुवारी या कालावधीत नोटीस काढून विशेष सहभाग घेऊन पदाधिकारी निवड केली जाणार आहेत.
ज्या ठिकाणी आरक्षण सोडत घेण्यात आली होती; परंतु त्याठिकाणी वेगळेच आरक्षण पडले आणि ते जात प्रवर्ग त्या ग्रामपंचायतीत उपलब्ध होत नसल्याचे समोर आले असल्याने सरपंचपद रिक्त राहू शकते, हे लक्षात घेऊन प्रशासनाने त्या ठिकाणी आरक्षण सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे याचा एकत्रित अहवाल तहसीलदारांच्या माध्यमातून राज्य शासनाकडे सादर केला जाणार आहे.