सराफ, हॉटेल मालकही थकबाकीदार

By Admin | Updated: March 2, 2016 00:55 IST2016-03-01T23:12:23+5:302016-03-02T00:55:54+5:30

सातारा पालिका : दोन दिवसांत फ्लेक्सवर नावे झळकणार

Saraf, hotel owner is also outstanding | सराफ, हॉटेल मालकही थकबाकीदार

सराफ, हॉटेल मालकही थकबाकीदार

सातारा : वर्षानुवर्ष पालिकेचा कर थकविणाऱ्यांमध्ये शहरातील बड्या लोकांचा समावेश असून या लोकांकडून वसुली करताना पालिकेच्या कर्मचाऱ्यांना नाकेनऊ येत आहे. सराफ व्यावसायिक, हॉटेल मालक आणि दुकानदारही थकबाकीदारांमध्ये अग्रेसर आहेत.
दर वर्षी मार्च महिना आल्यानंतर पालिकेची वसुली मोहीम तीव्र होते. यंदा कसेही करून वसुलीचे उधिष्ट पूर्ण करायचेच, या इराद्याने वसुली मोहीम सुरू झाली आहे. असे असतानाही थकबाकीची नोटीस पाठवूनही अनेकांनी पालिकेच्या नोटीसीला दाद दिली नाही. त्यामध्ये बड्यांचाही समावेश आहे. काहीजणांचा भाडेकरूचा वाद न्यायालयात सुरू असल्यामुळे पालिकेला वसुली करता येत नाही तर काहीजणांची पैसे भरण्याची परिस्थिती नाही, असे वसुली मोहिमेतील कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. मात्र यामध्ये विशेष म्हणजे ज्यांची पैसे भरण्याची परिस्थिती आहे, अशा लोकांनीही पालिकेचा कर थकविल्याचे समोर आले आहे. अशा ‘बड्या’ थकबाकीदारांची नावे फ्लेक्सवर झळकविण्यासाठी पालिकेकडून प्रयत्न सुरू झाले असून येत्या दोन दिवसांत त्यांची नावे झळकतील, असे वसुली अधीक्षक आंबादास वणवे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

आत्तापर्यंत
११ कोटी २० लाख वसूल
पालिकेची वसुली मोहीम सुरू होऊन तीन आठवडे झाले. आत्तापर्यंत पालिकेच्या तिजोरीत तब्बल ११ कोटी २० लाख जमा झाले आहेत. सोमवारी एकाच दिवसात ३७ लाख ४५ हजारांची विक्रमी वसुली झाली. तर मंगळवारी ९ लाख रुपये थकबाकीदारांकडून वसूल करण्यात आले. अद्यापही ९ कोटींची थकबाकी शिल्लक असून त्यातील पाच कोटींचे उदिष्ट्य वसुली मोहिमेला काहीही करून साध्य करायचे आहे.

हे आहेत.. थकबाकीदार
शनिवार पेठ भाग दोनमधील थकबाकीदार : कोंडीराम सखराम पंडीत (सराफ व्यावसायिक), चंद्रकांत राजाराम घोरपडे (हॉटेल अजंठा मालक), मुसा चाँद पालकर (दुकानदार),धनंजय बाजीराव जांभळे तर्फे एअरसेल लिमिटेड, भागिर्थीबाई गोविंदराव खंडाळकर, भरतकुमार उपाध्ये, कृष्णा सावळाराम चव्हाण, सिंधू दत्तात्रय मोकाशी (फोटोग्राफर), शंकर आण्णा सनगर, केशव गजानन ढवळे, शिवाजीराव शंकरराव कुमकर, गणपतराव बाबुराव सकटे, किसन संतु सकट, सुभाष सुदाम सकट, रघुनाथ आबा वायदंडे, रामु शिवा तुपे, हणमंत मल्हारी जाधव, भिकू मल्हारी जाधव, भिकू आण्णा गायकवाड, रामदास भिकू गायकवाड, अरूण यशवंत माने, मिलिंद एकनाथ पवार, जयाप्रभा चंद्रशेखर लोहार, ऋषीकेश नामदेव वांगडे, यशोदा पांडुरंग जाधव, बापु खाशाबा मोहिते, हणमंत बाबाजी जगदाळे आदींचा

Web Title: Saraf, hotel owner is also outstanding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.