शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
2
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
3
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
4
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
5
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
6
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
7
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
8
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
9
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
10
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघे जखमी
11
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
12
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
13
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
14
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
15
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
16
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
17
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
18
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
19
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
20
आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास

गोव्यात साताऱ्याचा डंका, संतोष शेडगे यांने पटकावला 'आयर्न मॅन' किताब

By सचिन काकडे | Updated: October 11, 2023 15:34 IST

सर्वांत खडतर स्पर्धा ६ तास ५७ मिनिटांत पूर्ण

सातारा : पणजी (गोवा) येथे नुकत्याच पार पडलेल्या स्पर्धेत साताऱ्यातील संतोष शेडगे यांनी २ किलोमीटर पोहणे, ९० किलोमीटर सायकलिंग व २१ किलोमीटर धावून ‘आयर्न मॅन’ बनण्याचा किताब पटकावला. त्यांच्या या यशाने सातारा जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा कोरले गेले.अत्यंत खडतर व शारीरिक क्षमतेचा कस लावणारी ‘आयर्न मॅन’ ही स्पर्धा जगातील सर्वांत कठीण स्पर्धा म्हणून गणली जाते. पणजी येथे झालेल्या स्पर्धेत ५० देशातील तब्बल १ हजार ३०० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. समुद्रातील खारे पाणी, त्यात उसळणाऱ्या मोठमोठ्या लाटा या लाटांवर स्वार होऊन दोन किलोमीटर पोहताना दमछाक होऊन जाते.यानंतर ९० किलोमीटर सायकलिंग व २१ किलोमीटर धावताना शारीरिक क्षमतेचा अक्षरश: कस लागतो. दमट वातावरण व उन्हाचे चटके सहन करून ही स्पर्धा पार करणे म्हणजे एकप्रकारचे दिव्यच असते. तरीदेखील संतोष शेडगे यांनी मोठ्या हिमतीने स्पर्धेचे एक - एक करत सर्व टप्पे ६ तास ५७ मिनिटांत पूर्ण करून ‘आयर्न मॅन’ बनण्याचा किताब पटकावत जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर कोरले.ही अवघड शर्यत पूर्ण करण्यासाठी संतोष शेडगे यांनी शिव स्पिरीटचे शिव यादव यांच्याकडे तीन महिने प्रशिक्षण घेतले. तसेच सुधीर चोरगे यांच्याकडे पोहण्याचा सराव केला. त्यांना आर्यन मॅन डॉ. प्रमोद कुचेकर, कमल उपाध्ये, योगेश ढाणे, आर्यन वुमन सुचिता काटे यांनी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल त्यांचे विविध स्तरातून कौतुक होत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरgoaगोवा