संजय पाटील यांनी फोटोवर पाय दिला
By Admin | Updated: May 13, 2014 23:49 IST2014-05-13T23:49:20+5:302014-05-13T23:49:42+5:30
सातारा : ‘२६ डिसेंबर २००८ ला मार्केट कमीटीमध्ये संजय पाटील यांच्यासोबत मी होतो. आमदार विलासराव पाटील-उंडाळकर आणि

संजय पाटील यांनी फोटोवर पाय दिला
सातारा : ‘२६ डिसेंबर २००८ ला मार्केट कमीटीमध्ये संजय पाटील यांच्यासोबत मी होतो. आमदार विलासराव पाटील-उंडाळकर आणि उदय पाटील यांचा फोटो असलेल्या घड्याळ्यावर मी पाय दिला नाही. संजय पाटील यांनी त्यावर पाय दिला. आणखी १० ते १२ जण तेथे गुलाल उधळत होते. पण त्यांना मी ओळखत नाही,’ अशी साक्ष विठ्ठल सोपान जाधव (रा. आटके ता. कºहाड) यांनी आज (मंगळवारी) न्यायालयासमोर दिली. महाराष्ट्र केसरी संजय पाटील यांच्या खून खटल्याची सुनावणी आज (मंगळवारी) जिल्हा न्यायालयात झाली. बचाव पक्षाच्या वतीने अॅड. डी. व्ही. पाटील, अॅड. राहूल धायगुडे यांनी साक्षीदार विठ्ठल जाधव यांचा उलट तपास घेतला. दरम्यान या घटल्याची पुढील सुनावणी १९ मे ला होणार आहे, अशी माहिती जिल्हा सरकारी वकील विकास पाटील-शिरगावकर यांनी दिली. (प्रतिनिधी)