सातारा : राज्याचे जलसंपदा मंत्री व सांगली चे पालकमंत्री जयंत पाटील हे कोणाच्या लढ्या मध्ये सातारकरांच्या मदतीला धावले आहेत जिल्हा प्रशासनाकडे यांच्यावतीने तब्बल 1 हजार लिटर सँनीटायझर देण्यात आले.प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी कोरोना संकटाशी लढण्यासाठी सदैव तत्पर आहेत. त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोरोना रुग्णाशी संपर्क येऊन त्यांनाही कोरोना होण्याची भीती असते. अशा परिस्थितीत त्यांच्या हाताचे, अंगाचे, कपड्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी सॅनिटाईझरची अत्यंत आवश्यकता आहे. हे लक्षात घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सातारा जिल्'ाकरिता एक हजार लिटर सॅनिटाईझर दिले.सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सुपूर्द करण्यात आले. जयंत पाटील यांनी सॅनिटाईझरची निर्मिती सुरू केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील संजय बैलकर व विक्रम नलावडे यांच्याकडे राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील यांनी दिले. यावेळी अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष शफिक शेख, खंडाळा तालुका युवक अध्यक्ष अजय भोसले, माऊली जगताप, श्रीनाथ यादव, प्रदिप लगस व राष्ट्रवादी चे पदाधिकारी उपस्थित होते.रोहित पवारांकडूनही यांची भेटकाही दिवसांपूर्वी बारामती ?ग्रो च्या वतीने तयार करण्यात आलेले ७00 लिटर सनी टायर्स जिल्हा प्रशासनाला भेट देण्यात आले होते. आता राष्ट्रवादीच्या दुसºया एका नेत्याने जिल्'ासाठी ही मदत केली आहे.स'ाद्री कारखान्यातर्फे 2000 लिटर्सची निर्मितीसाताºयाचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील स'ाद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या कारखान्याच्या वतीने जिल्हा प्रशासनाला 2000 लिटर्स सँनीटायझर देण्यात येणार आहेत. त्याची निर्मिती कारखान्याने सुरू केलेली आहे.
सांगलीचे पालकमंत्री धावले साताऱ्याच्या मदतीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 14:05 IST
अशा परिस्थितीत त्यांच्या हाताचे, अंगाचे, कपड्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी सॅनिटाईझरची अत्यंत आवश्यकता आहे. हे लक्षात घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सातारा जिल्'ाकरिता एक हजार लिटर सॅनिटाईझर दिले.
सांगलीचे पालकमंत्री धावले साताऱ्याच्या मदतीला
ठळक मुद्देकोरोनाशी लढा : तब्बल 1000 लिटर सँनीटायझरचे वितरण